Water began to flow automatically from the borewell Incidents in Sangola taluka 
सोलापूर

पावसाची करणी अन्‌ बोअरवेलमधून आपोआप वाहू लागले पाणी; सांगोला तालुक्‍यातील घटना 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : संगेवाडी (ता. सांगोला) परिसरात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे येथील शेतकरी रविंद्र खंडागळे यांच्या बोरवेलमधून आपोआपच पाणी बाहेर पडून वाहू लागले आहे. बोअरमधून आपोआप निघणाऱ्या पाण्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. 
तालुक्‍यातील काही भागात गेल्या वीस वर्षात प्रथमच एवढा पाऊस झाला असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. परिसरातील नदी, नाले, ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत. संगेवाडी मंडलमध्ये गुरुवारी (ता. 17) रोजी 62 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. मांजरी येथील ओढ्यावरील सर्व बंधारे भरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. तर संगेवाडी येथील ओढ्याच्या पात्राबाहेर संगेवाडी-धायटी रस्त्यावरून पाणी जाऊ लागले आहे. त्यामुळे ओढ्याच्या पात्रात बाहेर आलेल्या पाण्याने अनेकांचे डाळिंब, मका व इतर पिकांचे नुकसान झाले आहे. मुसळधार झालेल्या या पावसामुळे संगेवाडी येथील ओढ्याच्या पत्राजवळच शेती असणारे शेतकरी रविंद्र खंडागळे यांच्या बोरवेलमधून (विंधनविहीर) आपोआपच पाणी वाहू लागले आहे. आपोआप बोरवेलमधून येणारे पाणी पाहण्यासाठी या परिसरातील नागरिक येथे गर्दी करू लागले आहेत. विंधनविहिरीवरील मोटार सुरू न करता रात्रंदिवस या बोरमधून पाणी वाहू लागल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. एकेकाळी पाणीटंचाईने ग्रासलेल्या परिसरात निसर्गाच्या कृपेने बोअरवेलमधून आपोआप पाणी वाहू लागले आहे. 

संगेवाडी परिसरात डाळिंबाची क्षेत्र मोठे आहे. या अगोदर परिसरात डाळिंब, द्राक्ष बागा जगविण्यासाठी टॅंकरने पाणी घालावे लागत होते. एका टॅंकरसाठी दोन हजार पाचशे रुपये द्यावे लागत होते. सकाळ रिलीफ फंड व लोकसहभागातून या ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम झाले आहे. सध्या निसर्गाच्या कृपेने आज सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT