Solapur
Solapur  sakal
सोलापूर

सोलापूरला १५ जूननंतर ३ दिवसाआड पाणी! १ जूनला ट्रायल; पाणी चोरी लगेचच समजणार

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहराचा पाणीपुरवठा कमीतकमी दिवस करण्यासाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न चालू ठेवले आहे. पाच-सहा दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड करण्याच्या दृष्टिने नियोजन करण्यात आले आहे. १ जूनला त्याची चाचणी होईल आणि १५ जूनपासून जुळे सोलापूर, विडी घरकूल, गांधी नगर, सात रस्ता परिसर अशा बहुतेक ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे व्हिजन आहे.

औज बंधाऱ्यातून आलेले पाणी सोरेगाव येथे आणले जाते. तेथून पंपिंग करून जुळे सोलापुरातील ‘एमबीआर’वर (उंचावरील मुख्य जलकुंभ) घेतले जाते. त्यानंतर पुढे मेडिकल पंपहाऊसवरील १७५ एचपीचे दोन तर ९० एचपीच्या दोन संपात पाणी साठा करून घेतले जाते. त्या पंपातून उंचावरील जलकुंभ भरून घेतले जातात. पण, आता मेडिकल पंपहाऊस बंद करून सोरेगाववरून आलेले पाणी जुळे सोलापुरातील ‘एमबीआर’मधून थेट टाक्यांमध्ये सोडले जाणार आहे, जेणेकरून तीन दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल, या पार्श्वभूमीवर तसा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

विशेषत्वे, मेडिकल पंपहाऊस बंद केल्याने वेळेची व खर्चाची बचत होणार आहे. शिवाय तीन दिवसाआड पाणीपुरवठा शक्य होणार आहे. दुसरीकडे तो पंपहाऊस जुना झाल्याने त्याची क्षमता कमी झाली आहे. नवीन बदलानुसार, साधुवासवानी (मेडिकल पंपहाऊस) येथील पंपहाऊस बंद होणार आहे. तेथील संपात पाणी न घेता थेट टाक्यांमध्ये टाकले जाणार आहे. त्यामुळे विडी घरकूलपर्यंत पाणी जाईल असा अंदाज आहे. गांधी नगर, सात रस्ता येथील टाक्या थेट ‘एमबीआर’वरून भरल्या जातील. त्यामुळे तीन दिवसाआड पाणी नागरिकांना मिळेल. दुसऱ्या टप्प्यात नेहरू नगर व आदित्य नगर या भागातील पाणीपुरवठा सुधारला जाणार आहे.

नियोजनातील ठळक बाबी...

  • - १ जूनपासून तीन दिवसाआड पाणीपुरवठ्याची चाचणी अन् १५ जूनपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी

  • - ‘स्काडा’चा वापर करून पाणीपुरवठ्याचे चोख नियोजन

  • - पाणी चोरी किंवा पाण्याचा अपव्यय थांबणार

  • - ज्याठिकाणी पाण्याचा प्रेशर चांगला, तेथे अर्धातास कमी (अडीच तास पाणी मिळेल) होणार, शेवटच्या टोकाला तीन तास पाणीपुरवठा

  • - नियोजनबद्ध पाणीपुरवठ्यासाठी दररोज मॉनिटरिंग होणार

  • - उपलब्ध सहा अभियंत्यांवर राहणार त्याची प्रमुख जबाबदारी

  • - सध्या शहरासाठी दररोज १७० ते १८० एमएलडी पाणी येते.

  • - पण २४ तास पाणी देण्यासाठी २७० ‘एमएलडी पाण्याची गरज

  • - समांतर जलवाहिनी व अमृत योजनेची कामे मार्गी लागल्यावर होऊ शकतो दररोज पाणीपुरवठा

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ‘या’ अभियंत्यांची धडपड

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य अभियंता विजयकुमार राठोड, उपअभियंता व्यकंटेश चौबे, नीलकंठ मठपती, सहायक अभियंता रौफ सरकाझी, देवा मादगुंडी, कनिष्ठ अभियंता बाबा नगरे, सुनील होमकर, श्री. मिठ्ठा, श्री. बागवान, श्री.भोसले व श्री.काकडे या सर्व संबंधित इंजिनिअर टीमने शहराचा पाणीपुरवठा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: अमेठी, रायबरेलीची जागा लवकरच जाहीर होणार; खर्गे घेणार पत्रकार परिषद

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT