water problem
water problem esakal
सोलापूर

मार्चमध्येच घशाला कोरड! माजी महापौर, सभागृह नेत्यांच्या प्रभागातच पाच दिवसाआड पाणी

तात्या लांडगे

सोलापूर : 1990 च्या दशकात हद्दवाढ भाग महापालिकेत समाविष्ट झाला, पण अजूनही तेथील नागरिकांना 'अच्छे दिन'ची प्रतीक्षाच आहे. पक्‍के रस्ते नाहीत, ड्रेनेज नाही, पिण्यासाठी नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीही त्यांना मिळत नाही. महिलांना पहाटे वेळी-अवेळी पाणी भरावे लागते. तरीही, त्याठिकाणच्या प्रत्येक कुटुंबाकडून वर्षाकाठी पावणेतीन ते पावणेसात हजारांची पाणीपट्टी घेतली जाते. मार्च संपण्यापूर्वीच सोलापुकरांच्या घशाला कोरड पडली आहे. माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृहनेते शिवानंद पाटील यांच्या भागात चार-पाच दिवसाआड पाणी येऊ लागले आहे.

महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी 17 कोटींची पाणीपट्टी जमा होते. पण, जलसंपदा विभागाला महापालिकेने नियमित पाणीपट्टी दिलेली नाही. वापरलेल्या पाण्याची जवळपास 50 कोटींची थकबाकी महापालिकेकडून येणे असल्याचे जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांकडून दरवर्षी पाणीपट्टी वसूल केली, पण ना जलसंपदा विभागाला पैसे दिले ना हद्दवाढ भागातील नागरिकांसाठी पिण्याची पाईपलाईन टाकली, अशी स्थिती आहे. 2017 च्या निवडणुकीत सोलापुकरांना नियमित किंवा एकदिवसाआड पाणी देऊ म्हणून सत्तेवर विराजमान झालेल्या भाजप सत्ताधाऱ्यांना पूर्वीचा विस्कळीत पाणीपुरवठा सुध्दा सुरळीत करता आला नाही, हे विशेष. चार वर्षांपूर्वी समांतर जलवाहिनीचे टेंडर काढले, पण चार वर्षांत केवळ 16 किलोमीटरपर्यंतच काम पूर्ण झाले. आता सत्तेवरून पायउतार होताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवत राज्यातील सत्ता बदलल्यानेच समांतर जलवाहिनी वेळेत पूर्ण होऊ शकली नसल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता पूर्वी दोन्ही देशमुखांच्या वादाची चर्चा होत होती, पण महापालिकेवर सत्ता आल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांमध्येच वादविवाद पहायला मिळाले. सर्वसामान्य नागरिकांचे सोडा, माजी महापौर व सभागृहनेत्यांच्याच परिसरात पाच-सहा दिवसातून एकदा पाणी येऊ लागले आहे.

शहरातील पाणीपट्टीचे स्वरूप...
एकूण नळकनेक्‍शन
1,13,042
प्रत्येक कुटुंबाची पाणीपट्टी
2,754
पाऊण इंच कनेक्‍शनसाठी
6,876
बिगरघरगुतीसाठी पाणीपट्टी
11,556 ते 23,112
दरवर्षीची अपेक्षित पाणीपट्टी
17.19 कोटी

माजी सभागृहनेत्यांची खंत
टाकळी पंपहाऊस येथे तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे काही दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता, पण आता त्याठिकाणी दुरुस्ती झाली असल्याने पूर्वीच्या वेळापत्रकानुसार नागरिकांना पाणी मिळेल, असे महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी सांगितले. पण, वास्तविक पाहता महापालिकेवर सत्ताधारी असो वा प्रशासक परिस्थिती वेगळीच आहे. कुमठा नाका परिसरातील इंदिरा नगर, माधव नगर, आदर्श नगर येथे पाच दिवसाआड तर त्याच परिसरातील 70 नगरांमध्ये पाणीच येत नाही, अशी माहिती माजी सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: निवडणुकीतील अनिश्चिततेमुळे निर्देशांकांची दीड टक्का घसरगुंडी; सेन्सेक्स १०६२ अंश घसरला

Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

PBKS vs RCB Live Score : पंजाब किंग्जचंही चोख प्रत्युत्तर; रूसोची आक्रमक खेळी

Air India Express च्या केबिन क्रूचा संप संपला, 25 कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे घेणार

Virat Kohli PBKS vs RCB : पंजाब विराटवर फारच मेहरबान! पाच षटकात सोडले तीन कॅच; पाहा Video

SCROLL FOR NEXT