उजनी धरण  esakal
सोलापूर

उजनी ३४ टक्के! सोलापूर शहरासाठी २० डिसेंबरनंतर पाणी; औजमध्ये २० दिवसांचा साठा; धरणातील साठ्यावर शेतीच्या दुसऱ्या आवर्तनाचा निर्णय

उन्हाळा सुरू व्हायला अजून अडीच महिने शिल्लक असतानाही जिल्ह्याचा आधार असलेल्या उजनी धरणात ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरून सोलापूर शहराला १ डिसेंबरला नियोजित असलेले आवर्तन आता २० डिसेंबरनंतर सोडले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उन्हाळा अजून सुरू व्हायला अजून अडीच महिने शिल्लक असतानाही जिल्ह्याचा आधार असलेल्या उजनी धरणात सध्या ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरून सोलापूर शहराला १ डिसेंबरला नियोजित असलेले आवर्तन आता २० डिसेंबरनंतर सोडले जाणार आहे.

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात सध्या २० ते २२ दिवस पुरेल इतका पाणीसाठा (२.३० मीटर पाणीपातळी) आहे. सोलापूरसाठी भीमा नदीतून १ डिसेंबरला पाणी सोडण्याचे नियोजित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उजनीतील पाण्याचे नियोजन निश्चित झाले आहे.

आता उजनीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाण्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. सोलापूर शहरासाठी औज बंधाऱ्यात दोन टीएमसी पाणी सोडले जाते. मात्र, त्यासाठी भीमा नदीतून सहा ते साडेसहा टीएमसी पाणी सोडावे लागते. पुढच्या पावसाळ्यापर्यंत सोलापूरसाठी नदीतून किमान तीन ते चारवेळा पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या मागणीनुसार पाणी सोडले जाईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शेतीच्या दुसऱ्या आवर्तनावर प्रश्नचिन्ह!

पुढचा पावसाळा लांबेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे १ डिसेंबर ते ३० जून या सात महिन्यांपर्यंत उजनीतील पाणी पुरेल, असे नियोजन करावे लागणार आहे. शेतीसाठी कॅनॉलमधून पहिले आवर्तन सध्या सुरू असून १५ डिसेंबरला ते पाणी बंद केले जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे १० जानेवारीला शेतीसाठी दुसरे आवर्तन अपेक्षित आहे. पण, त्यावेळी उजनीतील पाणीसाठा विचारात घेऊन पिण्याला प्राधान्य द्यायचे की शेतीला आणखी एक आवर्तन सोडायचे हा निर्णय होणार आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

औजमध्ये मावते आता ६५ दिवसांचे पाणी

उजनीतून सोडलेले दोन टीएमसी पाणी औज बंधाऱ्यात साठवले जाते. किमान ६० ते ७० दिवस पुरेल इतका तो पाणीसाठा असतो. पण, चिंचपूर बंधाऱ्याला गळती लागल्याने ५० ते ५५ दिवसच पाणी पुरत होते. महापालिकेच्या वतीने चिंचपूर बंधाऱ्याची दुरुस्ती केली आणि आता ६५ दिवसांपर्यंत पाणी पुरते, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

SCROLL FOR NEXT