ujani dam 
सोलापूर

सोलापुकरांसाठी आनंददायी...उजनीतून सोडले पाणी 

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भिमा नदीद्वारे मंगळवारी (ता. 11) पाणी सोडण्यात आले आहे. सुरवातीला एक हजार 600 क्‍युसेक विसर्गाने हे पाणी सोडले जात असून टप्प्याटप्यात तो विसर्ग आठ हजार क्‍युसेकपर्यंत वाढविला जाणार आहे. भिमा नदीद्वारे सोडलेले हे पाणी 20 फेब्रुवारीला औज बंधाऱ्यात पोहचेल, असे नियोजन पाटबंधारे विभागाने केल्याची माहिती अधिक्षक अभियंता धिरज साळे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. 

उजनी धरणात सद्यस्थितीत 86 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून मागील वर्षीच्या तुलनेत तो समाधानकारक मानला जात आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात शहर-जिल्ह्यासाठी पाणी पुरेसे असल्याचा विश्‍वास पाटबंधारे विभागाने व्यक्‍त केला आहे. आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पुढील आवर्तनाचे नियोजन ठरणार आहे. तत्पूर्वी, मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे सोलापूर शहरासाठी आता पाणी सोडण्यात आले आहे. नदीद्वारे पाणी सोडले जाणार असल्याने या आवर्तनात एकूण पाच टीएमसी पाणी उजनी धरणातून कमी होईल, असेही पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. या आवर्तनामुळे सोलापूर शहराला पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत पाणी पुरेल, असा विश्‍वासही व्यक्‍त करण्यात आला. 

भिमा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले
मागच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकी ठरल्याप्रमाणे एक आवर्तन शेतीसाठी सोडण्यात आले. आता सोलापूर शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा या हेतूने भिमा नदीद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. आता सोळाशे क्‍युसेक विसर्ग असून टप्प्याटप्याने त्यात आठ हजार क्‍युसेकपर्यंत वाढ केली जाईल. 
- धिरज साळे, अधिक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, सोलापूर 


ठळक बाबी... 

  • उजनीतून सोलापुरसाठी आठ हजार क्‍युसेकने पाणी 
  • उजनी धरणात सध्या 86 टक्‍के पाणीसाठा : पाच टक्‍क्‍यांनी कमी होणार पाणीसाठा 
  • गुरुवारी (ता. 20) भिमा नदीद्वारे सोडलेले पाणी पोहचणार औज बंधाऱ्यात 
  • उन्हाळी आवर्तनाचे नियोजन आगामी कालवा समितीच्या बैठकीत ठरणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT