The water of Mahisal in the last phase of Sangola 
सोलापूर

सांगोल्यातील शेवटच्या टप्प्यात म्हैसाळचे पाणी

सकाळ वृत्तसेवा

सांगोला : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या आदेशामुळे सांगोला तालुक्‍यांमध्ये म्हैसाळचे पाणी अखेरच्या टप्प्यांमध्ये आले आहे. हंगिरगे येथील वाघ तलावात पाणी पोहचातच सदर पाण्याचे पूजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सचे पालन करीत करण्यात आले.


म्हैसाळ योजनेचे पाणी या भागात दाखल झाले आणि आज जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आहे, त्यातच खरे समाधान असल्याचेही पाणी पूजना दरम्यान दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले. यावेळी सरपंच सुग्रेशन सावंत, माजी सरपंच आप्पासाहेब वाघ, धोंडीराम काटे, अशोक चोरमुले, दिलीप मोटे, आबासो कोरे, बिरू घुणे, बंडू साबळे, सुरेश काटे, सर्जेराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. 


दुष्काळी तालुक्‍यातील नागरिकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी जलसंपदामंत्री सांगोला येथे आले असता, तालुक्‍याच्या दुष्काळी भागाला टेंभू व म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडावे, अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी केली होती. दरम्यान महापुराचे पाणी नदी, नाले, ओढे यामार्फत वाहून जात आहे. तेच पाणी दुष्काळी भागाला म्हणजे सांगोला तालुक्‍याला सोडले तर या भागातील पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे. तसेच शासनाचा पाण्यावर कोट्यावधी रुपये होणारा खर्च देखील वाचणार आहे.

याबाबतही विचार करावा अशी मागणी करण्यात आली होती. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील काही दिवसापूर्वीच दुष्काळी भागाला महापुराचे पाणी सोडणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याबरोबर संबंधित खात्याला आदेश देऊन म्हैसाळ योजनेचे पाणी सांगोला तालुक्‍याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोडण्यात यावे असेही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सांगोला तालुक्‍यातील हंगिरगे येथे म्हैसाळ योजनेचे पाणी दाखल झाले आहे. सदरचे पाणी गावात दाखल होताच शेतकरी नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT