Water released from Ujani dam to Solapur city for drinking 
सोलापूर

उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी सोडले पाणी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहराला पिण्यासाठी पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. आज सकाळी ६ वाजलेपासून हे पाणी सोडले जात आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औंज बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे. 
धरणातून सुरवातीला कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. हळूहळू भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यात येणार आहे. धरणातून भीमा नदीमध्ये जवळपास सहा हजार क्युसेकने पाणी सोडले जाणार आहे. सोलापूर शहर, पंढरपूर, मंगळवेढा या शहराला पिण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. जवळपास १०-१२ दिवसांनी हे पाणी आैज बंधाऱ्यात पोचण्याची शक्यता आहे. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाच टीएमसी एवढे पाणी सोडले जाणार आहे. नियोजनात ठरल्यानुसार हे पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा वजामध्ये गेल्याने त्यातूनच आता पाण्याचा उपसा होणार आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा सध्या वजा १६ टक्याच्या पुढे गेला आहे. कालव्यातून व बोगद्यातूनही सध्या पाणी सोडले जात आहे. त्यातच आता भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील उपयुक्त पाणीसाठा खूपच कमी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Rain Disruption : मुसळधार पावसाचा मुंबई- पुणे रेल्वेसेवेलाही फटका! १६ गाड्या रद्द, अनेकांचे मार्ग वळवले, विमान सेवेवरही परिणाम

Mahind Dam: मुसळधार पावसाने महिंद प्रकल्प ओव्हरफ्लो! सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरू; धोकादायक शॉर्टकट टाळण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली; संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Visapur Fort: विसापूर गडाचे रहस्य उलगडले! भुयारानंतर आता प्राचीन अपरिचित लेणीचा शोध; दोन पाण्याच्या टाक्या आणि विश्रांती कक्षही आढळला

ढिंग टांग : बाई या पावसानं..!

SCROLL FOR NEXT