सोलापूर

BREAKING.....! औज बंधाऱ्यात पाणी पोचले, तीन महिन्यांचा प्रश्न मिटला

विजयकुमार सोनवणे


सोलापूर : सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी मजलदरमजल करीत आज शुक्रवारी सकाळी औज बंधाऱ्यात पोचले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंधाऱ्यात साडेतीन मीटर पाणीसाठा झाला होता. रात्री उशीरा ओव्हरफ्लो होऊन पाणी वाहण्यास सुरवात होईल. पाणी पोचल्यामुळे शहराचा किमान तीन महिन्यांचा पाणीप्रश्न सुटला आहे. 

सोलापूर शहरात प्रत्येकवर्षी मार्चची सुरुवात झाली की उन्हाळ्याच्या झळा तीव्र होतात, त्याचवेळी पाणीटंचाईही सुरु होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाची धावपळ सुरु होते. यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे सोलापूरकर त्रस्त आहेत, त्यातच पाण्याची अडचण निर्माण झाली असती तर शहरात वेगळे चित्र निश्चित दिसले असते. पाण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले असते. सुदैवाने गेल्या तीन महिन्यांत शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवली नाही. महापालिकेच्या नियोजनानुसार शुक्रवारी पोचलेले पाणी दोन दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी रात्री किंवा बुधवारी सकाळी पोचणे अपेक्षित होते. मात्र धरणातील पाण्याचा प्रवाह वाढविण्यात न आल्याने पाण्याचा वेग कमीच राहिला, परिणामी नियोजनापेक्षा दोन दिवस उशीरा पाणी पोचले.

सध्या गळती दुरुस्तीसाठी टाकळी ते सोलापूर योजनेवर काम घेण्यात आले होते. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे गेला आहे. औज बंधाऱ्यात पाणी कधी पोचेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. हे पाणी वेळेत पोचले नसते तर शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असती आणि पाण्याचे वेळापत्रकही बदलावे लागले असते. तशी प्राथमिक तयारी महापालिका
प्रशासनाने केली होती. दरम्यान, उजनी धरणात पाण्याची पातळी उणे झाली आहे. त्यामुळे भविष्यात शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी गरज भासली तर दुबार पंपींग करावे लागणार आहे. त्याचेही नियोजन महापालिका प्रशासनाने केले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde : ओबीसी मेळाव्यांना अनुपस्थित राहिलेल्या पंकजा मुंडे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी; धनंजय मुंडेही सोबतीला...

Latest Marathi Live Updates : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अजित पवार 'वर्षा'वर

'PM Kisan'च्या 17व्या हप्त्याची घोषणा; जाणून घ्या, कधी जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे

Cristiano Ronaldo Euro Cup 2024 : पोर्तुगालचा 39 वर्षाचा ख्रिस्तियानो रोनाल्डो युरो कपनंतर घेणार निवृत्ती?

UPSC 2024 : AI ची कमाल! सात मिनिटांत सोडवला यूपीएससी प्रीलिम्सचा पेपर; किती मार्क मिळाले?

SCROLL FOR NEXT