Solapur Water Supply Sakal
सोलापूर

Solapur Water Supply : सोलापुरात रविवारपासून पाच दिवसांआड पाणी; उजनीतून आज सोडणार शहरासाठी पाणी

Solapur Ujani Dam : उजनी धरणातील पाणी पातळी घटल्याने यापूर्वीच दुबार पंपिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : सोलापूर शहराला एकीकडे वाढत्या तापमानाचा फटका बसत असताना दुसरीकडे उजनीतील पाणीपातळी वरचेवर घटत आहे. शहराला रविवारपासून (ता. १२) सर्व भागात सरसकट पाच दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. दरम्यान, सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून उद्या (ता. १०) सकाळी नऊपासून १५०० क्युसेक वेगाने सोडण्यात येणार आहे.

उजनी धरणातील पाणी पातळी घटल्याने यापूर्वीच दुबार पंपिंगची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गुरुवारी उजनीतील पाणीपातळी वजा ४३ टक्के होती. साधारणतः वजा ५२ टक्के पाणीपातळी झाल्यानंतर तिबार पंपिंगची यंत्रणा सुरू करावी लागते. या तिबार पंपिंगसाठी आवश्यक साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात येणारे पाणी २० जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे गरजेचे आहे. त्यासाठी सोलापूर शहराला १२ मेपासून सरसकट सर्व भागांमध्ये पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याचा अपव्यय टाळावा व महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी २० जुलैपर्यंत जपून वापरावे लागणार आहे. सध्या शहरातील काही भागात ४ दिवसाआड तर काही भागात ५ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी शुक्रवारी १० मे २०२४ रोजी पाणी सोडण्यात येणारे पाणी २० मे दरम्यान पोचणार आहे. या आवर्तनातील हे पाणी सोलापूर शहरासाठी २० जुलैपर्यंत पुरवावे लागणार आहे. पाऊसकाळ लांबला तरी पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ नये त्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजन करण्यात येत आहे.

— व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता महापालिका, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT