ujani dam esakal
सोलापूर

शेतीसाठी उजनीतून 5 एप्रिलला सुटणार पाणी! धरणात 99.98 टीएमसी पाणी

उन्हाळी पिकांना पाण्याची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर उजनी धरणातून 5 एप्रिलला डावा व उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे. 5 एप्रिल ते 5 मे या काळात कालव्यातून (कॅनॉलद्वारे) शेतीसाठी सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उन्हाचा तडाखा वाढला असून शेतकऱ्यांचा ऊस तुटून कारखान्याला गेला आहे. उन्हाळी पिकांना पाण्याची गरज आहे. या पार्श्‍वभूमीवर उजनी धरणातून 5 एप्रिलला डावा व उजव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याचे नियोजन झाले आहे. 5 एप्रिल ते 5 मे या काळात कालव्यातून (कॅनॉलद्वारे) शेतीसाठी सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.

सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणामुळे तिन्ही जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला मोठा दिलासा मिळाला आहे. या जिल्ह्यातील शेतीला मोठा हातभार लागला असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत उजनी धरणाचा मोलाचा वाटा राहिला आहे. मागील वर्षी पुणे जिल्ह्यासह धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण 120 टक्‍क्‍यांपर्यंत भरले होते. शेतीसाठी मागच्या महिन्यात पाणी सोडले आहे. तरीही, आता उन्हाचा ताव वाढल्याने शेतीपिकांनी माना टाकायला सुरू केले आहे. शेतकऱ्यांनीही पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पार पडलेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत 5 एप्रिलपासून पाणी सोडण्याचे नियोजन निश्‍चित झाले आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणी पातळी अधिक आहे. 25 मार्च 2021 रोजी धरणात 94.60 टीएमसी पाणी होते. यंदा 100.20 टीएमसी पाणी आहे. उजनीतून बारामती औद्योगिक वसाहतीलाही पाणी दिले जाते. तसेच जलाशयातून काही प्रमाणात पाणी उपसा होतो, काही गावांना धरणातूनच पाणीपुरवठा होतो, सोलापूर शहरासाठीही धरणातूनच पाणी सोडले जाते. दुसरीकडे बाष्पीभवनही होते. तरीही, यंदा पाणी पातळी चांगली असल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गरज पाहून उन्हाळी आवर्तन सोडले जाणार आहे. तसेच महापालिका प्रशासनाच्या मागणीनुसार सोलापूर शहरासाठीही वेळोवेळी पाणी सोडले जाणार आहे.

धरणात समाधानकारक पाणीसाठा
कालवा सल्लागार समितीत झालेल्या निर्णयानुसार उजनी धरणातून एप्रिल रोजी कालव्यातून पाणी सोडले जाणार आहे. या उन्हाळी आवर्तनासाठी एक महिनाभर सहा टीएमसी पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडले जाणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा समाधानकारक आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, जलसंपदा, सोलापूर

धरणाची सद्य:स्थिती...
एकूण पाणीसाठा
67.80 टक्‍के
एकूण पाणी
99.98 टीएमसी
मागील वर्षी पाणीसाठा
94.60 टीएमसी
सध्या उपयुक्‍त पाणीसाठा
36.32 टीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahabhumi Stack Maharashtra : जमिनीची माहिती आता एका क्लिकवर; ‘महाभूमी स्टॅक’मुळे व्यवहार पारदर्शक, ७/१२, नकाशा, फेरफार फसवणुकीला बसणार आळा

Pune News : बनावट प्रमाणपत्रे देऊन पुणे पोलिस दलात १९ उमेदवार भरती झाल्याचे उघडकीस; दोघांना अटक

IND vs PAK Asia Cup: ना हस्तांदोलन, ना नजरेला नजर.. हरमनप्रीत कौरचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टॉसच्या वेळीच उतरवला पाकिस्तानचा माज

Bhoom News : ईटच्या सुपुत्र डॉ. किरण प्रकाश झरकर यांचा राष्ट्रपतीं द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते दिल्ली येथे राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

Ketan Agarwal case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तिसरा आरोपी अटकेत! कोण आहे रितेश हांगे? गुन्ह्यातला मास्टरमाईंड बीडचा?

SCROLL FOR NEXT