Auj_bandhara 
सोलापूर

औज बंधाऱ्यात आज पोचणार उजनीचे पाणी ! बंधाऱ्याने गाठला तळ अन्‌ टाकळी जॅकवेलमध्ये एक दिवसापुरतेच पाणी 

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदी, बोगदा व कालव्यांद्वारे रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्यात आले आहे. सोलापूर शहरासाठीही पाणी सोडण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत उजनीचे पाणी औज बंधाऱ्यात पोहचेल, असा विश्‍वास महापालिकेच्या आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला. 

औज बंधाऱ्यातील पाणी पातळी आता शून्यावर आली आहे. शहराला तीन दिवसाआड तर हद्दवाढ भागाला चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. औज बंधाऱ्याने कोरड गाठली असून टाकळी जॅकवेलमध्ये साडेतीन फूट पाणी आहे. पाणी पातळी दीड फुटावर आल्यानंतर पाणी उपसा होत नाही. शहराला आता एक वेळच पाणी सोडता येईल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महापालिकेने पाटबंधारे विभागाला पत्र व्यवहार करून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार पाणी सोडण्यात आले असून गुरुवारी सायंकाळी पाणी औज बंधाऱ्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांची आगामी दोन- अडीच महिन्यांची चिंता दूर होणार आहे. 

ना गळतीवर नियंत्रण, ना पाणी चोरीवर निर्बंध 
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्रोतांमधून तब्बल 30 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत गळती होऊ लागली आहे. तर दुसरीकडे शहरात पाणी चोरीचे प्रकार वाढल्याचेही आरोग्य व पाणी पुरवठा अभियंता कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्याबद्दल महापालिकेकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी नियमित तथा एक- दोन दिवसाआड पाण्याचे आश्‍वासनही सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केलेले नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळा, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावीच लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

आता महापालिका निवडणूक एक वर्षावर आल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्याची चर्चा आहे. 2017 मध्ये तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनीही दोन दिवसाआड पाणी देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्याचीही पूर्तता झालेली नाही. आता सत्ताधारी त्यावर कशाप्रकारे मात करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

महाराष्ट्र 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणी संजय राऊतांचा मोठा दावा, भाजपवर थेट इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT