सोलापूर

आम्ही सुखी आहोत, स्वतःची काळजी घ्या 

संतोष सिरसट

सोलापूर ः आमच्याकडे वाहतूक सुरळीत आहे. किराणा माल व्यवस्थित मिळतो. दुकानातून माल आणून जेवण तयार करून खातो. त्यामुळे आम्ही इकडे सुखी आहोत. आमची काहीही काळजी करू नये. मात्र, तुम्ही तिकडे स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन जर्मनीतून प्रतीक सुतार हा आपल्या आई-वडिलांना करतो. 

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका अश्‍विनी लोंढे-सुतार यांचा मुलगा प्रतीक हा "एमएस इन मेकाट्रॉनिक्‍स' या विषयाच्या शिक्षणासाठी जर्मनीतील जिगन या शहरात राहतो. 1 सप्टेंबर 2018 ला तो सोलापूर येथून जर्मनीला गेला आहे. तो अद्यापही सोलापूरला परत आलेला नाही. कोरोना विषाणूंचा गोंधळ सुरू झाल्यानंतर तो 19 मार्चला भारतात येणार होता. त्याने विमानाचे तिकीटही काढले होते. मात्र, 16 मार्चला भारताने एकही विमान परदेशातून भारतात येणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला भारतात येता आले नाही. 17 मार्चला त्याचा पहिल्या सेमिस्टरचा शेवटचा पेपर होता. तो पेपर देऊन तो भारतात येणार होता. मात्र, विमानच रद्द झाल्याने त्याला भारतात येता आले नाही. तो व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून दिवसातून दोनवेळा आपल्या आई-वडिलांशी संवाद साधतो. आम्ही ज्याठिकाणी राहतो त्याठिकाणी काहीही अडचण नसल्याचे तो सांगतो. तो राहात असलेल्या जिगन शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याचे तो सांगतो असे त्याची आई अश्‍विनी लोंढे-सुतार यांनी "सकाळ'ला सांगितले. 20 एप्रिलनंतर त्याच्या कॉलेजचे सेकंड सेमिस्टार सुरू होणार आहे. पण, त्याबाबत कॉलेज काय निर्णय घेते हे अद्यापही निश्‍चित नाही. त्यामुळे तो सोलापूरला कधी येणार हे अद्याप अंतिम झालेले नाही. जर्मनीच्या दूतावासांनी तुमच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याबाबत भारताच्या दूतावासाशी संपर्क साधला होता. मात्र, विमानसेवा बंद झाल्याने त्यावर पुढे काहीच होऊ शकले नाही. सुतार यांच्यासोबत सोलापूरचे वरुण बुक्का, सिद्धार्थ भंडारी, प्रथमेश नावरे हे इतर तीन विद्यार्थी आहेत असेही त्यांनी सांगितले. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT