Solapur Weather Update Sakal
सोलापूर

Solapur Weather Update : शहरात उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमान; सोलापुरात पहाटे थंडी, दिवसा नागरिकांना उन्हाचे चटके

सोलापूर शहर व परिसरातील वातावरण सध्या विचित्र झाले आहे. पहाटे व रात्रीच्या सुमारास थंडी आणि दिवसा उन्हाचा तडाखा असे वातावरण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील वातावरण सध्या विचित्र झाले आहे. पहाटे व रात्रीच्या सुमारास थंडी आणि दिवसा उन्हाचा तडाखा असे वातावरण झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर शहर व परिसरात यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे.

शुक्रवारी ३९.१अंश सेल्सिअसनंतर आज शनिवारी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज सोलापूर शहर व परिसरात झाली.उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने दुपारच्या सुमारास बाहेर पडणे शक्यतो नागरिक टाळू लागले आहेत.

मार्च महिन्याच्या सुरवातीस तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागल्याने आणखी एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा कुठपर्यंत जाईल? याचा अंदाज व्यक्त करूनच आगामी उन्हाळ्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

दुपारच्या उन्हाच्या तडाख्याच्या उष्ण झळा सूर्यास्तानंतरही जाणवत आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल्स, टोप्या, पांढरे रुमाल, पांढरे कपडे घालण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. थंडी व उन्हाचा तडाखा यामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या सारखे विकार उद्‌भवताना दिसत आहेत.

उन्हाचा तडाखा वाढला तरीही शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी, वारंवार पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे. सोलापूर शहर व परिसरात होळीनंतर उन्हाची तीव्रता वाढत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यंदा होळीपूर्वीच उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. या वर्षी पाऊस कमी झाल्याने टंचाईच्या झळा अधिक प्रखरतेने जाणवण्याची शक्यता आहे.

१४ मार्चपर्यंत उन्हाचा तडाखा

भारतीय हवामान विभागात व्यक्त केलेल्या अंदाजात सोलापूर शहर व परिसरात १४ मार्चपर्यंत उन्हाचा तडाखा कायम राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १० व ११ मार्च रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर १२ व १३ मार्च रोजी तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. १४ मार्च रोजी सोलापूरच्या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‌

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT