कुर्डुवाडी (सोलापूर) : फळे, भाज्या यांसारखा नाशवंत शेतीमाल व मासे वाहतुकीसाठी कुर्डुवाडी मार्गे कोल्हापूर ते मुझफ्फरपूर ही साप्ताहिक किसान रेल 21 ऑगस्टपासून धावणार असल्याची माहिती कुर्डुवाडी रेल्वे स्थानक प्रबंधक आर. डी. चौधरी यांनी दिली. ही गाडी दर शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता कोल्हापूरहून मुझफ्फरपूरकडे धावेल. तर दर रविवारी सकाळी साडेआठ वाजता मुझफ्फरपूरहून ही गाडी कोल्हापूरकडे धावणार आहे.
कोल्हापूर ते मुझफ्फरपूर ही साप्ताहिक किसान रेल मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड, अहमदनगर, मनमाड या स्थानकांवर थांबा घेणार आहे. मालाची चढ-उतार करण्यासाठी ही रेल्वेगाडी संबंधित स्थानकावर पुरेसा वेळ थांबणार आहे. शेतकरी व शेतमाल व्यापारी यांनी या मालाची वाहतूक करण्यासाठी जवळील रेल्वे स्थानक प्रबंधकाशी संपर्क साधण्याचे आवाहन स्थानक प्रबंधक श्री. चौधरी यांनी केले आहे. या गाडीला पाच व्हीपीयू (पार्सल डबे), एक ब्रेक व्हॅन असणार आहे. दौंडला एक व्हीपीयू वाढविण्यात येणार आहे. दर शुक्रवारी ही गाडी (क्र. 00109) कोल्हापूरहून पहाटे साडेपाच वाजता निघाल्यानंतर मिरज येथे सकाळी साडेसहा वाजता, सांगोला येथे सकाळी साडेआठ वाजता, पंढरपूर येथे सकाळी नऊ वाजून 55 मिनिटांनी, कुर्डुवाडी येथे सकाळी सव्वा अकरा वाजता, दौंड येथे दुपारी पावणे दोन वाजता, अहमदनगर येथे दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी, मनमाड येथे सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी, दानापूर मार्गे मुझफ्फरपूर येथे रविवारी पहाटे पावणे पाच वाजता पोचणार आहे.
रविवारी त्याच दिवशी (क्र. 00110) ही गाडी सकाळी आठ वाजता मुझफ्फरपूर येथून निघणार आहे. दानापूर मार्गे प्रवास करत सोमवारी रात्री आठ वाजता मनमाड, अहमदनगर येथे रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी, दौंड येथे मंगळवारी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी, कुर्डुवाडी येथे रात्री दोन वाजून 40 मिनिटांनी, पंढरपूर येथे पहाटे चार वाजून 20 मिनिटांनी, सांगोला येथे पहाटे पाच वाजून पाच मिनिटांनी, मिरज येथे सकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी, तर कोल्हापूर येथे सकाळी साडेआठ वाजता पोचणार आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.