NIMA 
सोलापूर

"आयएमए'चा बंद ! मात्र केंद्र शासनाच्या अध्यादेशाचे स्वागत करत "निमा'ची गुलाबी फीत लावून रुग्णसेवा 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : केंद्र शासनाने शालेय व शालेय क्रिया तज्ज्ञ यांच्यासंदर्भात स्वतंत्र शस्त्रक्रिया करण्याबाबत अध्यादेश काढला. या अध्यादेशाचे स्वागत करण्यासाठी व आयएमएने पुकारलेल्या बंदमुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी निमा संघटनेच्या सदस्यांनी गुलाबी फीत लावून शुक्रवारी (ता. 11) रुग्णांसाठी सकाळी सहा ते रात्री 10 या कालावधीत सेवा उपलब्ध करून दिली. 

केंद्र शासनाने आयुर्वेदिक शल्यक्रिया व शालाक्‍य तज्ज्ञांना शस्त्रक्रिया करण्याबाबत सूचना करणारे अध्यादेश काढले. या अध्यादेशाचे स्वागत निमा संघटनेच्या सदस्यांनी गुलाबी फीत लावून केले. तसेच शुक्रवारी आयएमएने वैद्यकीय सेवा बंदचे आंदोलन पुकारल्याने रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून आयुष कृती समितीमार्फत डॉक्‍टरांना सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीत रुग्णांना सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. 

यासंदर्भात निमा संघटनेने भूमिकादेखील मांडली. मुळात अध्यादेश केंद्र सरकारने काढला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना वेठीस धरण्याचे कारण नाही. तसेच केंद्र सरकारने काढलेला आदेश हा आयुर्वेदिक शल्यक्रिया व शालाक्‍य क्रिया तज्ज्ञांशी संबंधित आहे. त्याबद्दल इतर क्षेत्रातील वैद्यकीय संघटनांनी विरोध करणे हे अव्यवहार्य आहे. बीएएमएस विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी देखील नीट परीक्षा असते. त्याआधारे त्यांचा प्रवेश होतो. सर्व प्रकारच्या आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाच्या शिक्षणाद्वारे हा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. पदव्युत्तर शल्य व शालाक्‍य अभ्यासक्रमातही कठोर परीक्षण करून हे तज्ज्ञ काम करत असतात. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक शल्यक्रिया तज्ज्ञ उत्तम पद्धतीने शस्त्रक्रिया करत आहेत. त्यामध्ये केंद्राने केवळ शस्त्रक्रियांची निश्‍चिती करणारा अध्यादेश काढल्याचे निमाचे मत आहे. 

आयुर्वेद शल्य व शालाक्‍य क्रिया तज्ज्ञ पूर्वीपासून शस्त्रक्रिया करत आहेत. त्याबाबत केवळ एक आदेश केंद्र शासनाने काढला आहे. त्यामुळे त्याबाबत कोणताही विरोध असण्याचे कारण नाही. 
- डॉ. रूपेश एडके, 
शहराध्यक्ष, निमा संघटना 

निमा संघटना नेहमीच सर्व प्रकारच्या वैद्यक शाखा एकत्रितपणे रुग्णांच्या हितासाठी काम करावे, हा एकात्मिक दृष्टिकोन ठेवते. या व्यापक भूमिकेवर निमा संघटना कायम राहणार आहे. 
- डॉ. विनायक टेंभुर्णीकर, 
सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT