well and gharkul scheme stop prahar warn to strike solapur politics
well and gharkul scheme stop prahar warn to strike solapur politics  sakal
सोलापूर

Solapur News : मनरेगा विहीर व घरकूल कामे रखडली,प्रहारचा उपोषणाचा इशारा

हुकूम मुलाणी ​

मंगळवेढा : पंचायत समितीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून नवीन विहिरी व घरकुल तसेच गाय गोठा योजना या बंद असल्याने मज्ाुरासह लाभार्थ्याची होरपळ होत असून कामास तात्काळ प्रशासकीय देऊन सुरुवात करावी अन्य 17 एप्रिल रोजी पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे प्रहार संघटनेच्या वतीने गटविकास अधिकाय्राला दिला.

सदरचे निवेदन तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे, रावसाहेब बिले, शिवाजी आकळे ,प्रकाश आसबे यांनी दिले असून या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील गोरगरीब अल्पभूधारक, मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील महिला कुटुंब असलेल्या लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून चार लाख रुपये च्या अनुदान देण्यात येते.

यामुळे दुष्काळी भागात त्या लोकांना रोजगाराचे साधन व पाणी साठवण्याचे साधन निर्माण होऊ शकेल.शिवाय एप्रिल व मे हे दोन महिने मजुरांच्या व विहीर लाभार्थ्यांच्या हातात आहेत पण मंजूरीस विलंब केल्यास पावसाळयात या योजनेची कामे पुर्ण होणू शकणार नाही परिणामी लाभार्थी आर्थीक अडचणीत येवू शकतो.

पावसाळयापुर्वी कामे पुर्ण झाल्यास लाभार्थ्याला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास ही योजनेची फलनिष्पती दिसून येईल अन्यथा या योजनेची मंजूर कामे कागदावर राहू शकतील.याशिवाय ग्रामसेवक व प्रशासन यांच्या अंतर्गत वादामुळे शेतकर्‍यांचे हजेरीपत्रकावर सही न करण्याची भूमिका घेतल्यामुळे घरकुल व विहीर लाभार्थ्याचे मोठया प्रमाणात आर्थीक नुकसान झाले पण गोरगरीब लाभार्थ्याला वेठीस धरण्याचा प्रकार केला जात आहे तर जनावरासाठी असलेल्या गोठयाच्या योजनेसाठीचे प्रस्ताव घेवून पंचायत स्तरावर पडून आहेत.

त्याला मंजूरी मिळाली नाही.तालुक्यात सर्वच ग्रामपंचायतीचा दिव्यांग निधी खर्च केला नाही ज्या ग्रामपंचायतचा निधी कागदावर खर्च केला आहे त्या ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी व समाज कल्याणच्या सेस फंडातील दिव्यांगाचा निधी अर्थपुर्ण व्यवहार करुन एकाच गावात वाटप केला.व तो निधी देखील कागदावर खर्च दाखवला अशा कर्मचार्‍यावर कारवाई करावी किंवा त्याचे निलंबन करावे असे निवेदनात नमुद केले.निवेदन देताना गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी उडवा उडवी चे उत्तर दिली.

पंचायत समितीमधील दिव्यांगांचे काम पाहणाय्रा कर्मचाय्राला प्रहारच्या पदाधिकार्‍यांनी जाब विचारला असता खुर्च्या वाटप केल्याचे कागदोपत्री दाखवले पण प्रत्यक्षात त्याचे वाटप करण्यात आले नसल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा 17 एप्रिल रोजी दिव्यांगाना सोबत घेऊन मंगळवेढा पंचायत समिती समोर बेमुदत उपोषण सुरू करू

- समाधान हेंबाडे तालुकाध्यक्ष प्रहार संघटना

पंचायत समितीमध्ये सध्या प्रशासक असल्याने अधिकारी व कर्मचाय्राची मनमानी होत आहे एका कामासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात म्हणून आ समाधान आवताडे यांनी नगरपालिकेच्या व महावितरणच्या प्रश्नावर बैठक घेवून मार्गी लावण्याच्या दिल्या त्याप्रमाणे पंचायत समिती स्थरावरील रखडलेल्या कामासाठी बैठकीत तक्रारदार व कर्मचारी यांच्यात समोरासमोर घेवून ग्रामीण भागातील लाभार्थ्याच्या प्रश्नाला न्याय दयावा अशी मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT