Mahesh Mittha 
सोलापूर

जेव्हा अभियंता किचनमध्ये शेफ बनतो तेव्हा..: महेश मिठ्ठा यांची आगळी कामगिरी 

अनुराग सुतकर

सोलापूर ः अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर पुण्या-ंबईतील नोकरीचा नाद सोडून महेश मिठ्ठा या तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करत सोलापुरातच करिअरचा नवा मार्ग अवंलंबिला आहे. अभियंत्याचे स्वप्न पाहत चक्‍क तो किचन सुरु करुन शेफ बनला आहे. 
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी आपला रोजगार गमावला तर शहरातील अनेक युवकांनी स्वतःसाठी स्वत:च रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. त्यातीलच एक महेश मिठ्ठा. जुन्या वळणांना मागे टाकत त्यांनी नवा व्यवसाय सुरु केला. स्वत:च्याच हॉटेलमध्ये स्वत:च सर्व डिश बनवत आहे. महेश याने पदवीचे शिक्षण हे ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजमधून घेतले. शिक्षणानंतर एक वर्ष पुण्यात मॅनेजमेंट क्षेत्रात नोकरी केली. परंतु त्याची जिद्द आणि चिकाटी एवढी होती की, सोलापुरात राहून काहीतरी वेगळे करण्याचे ध्येय बाळगून सोलापूरचा रस्ता धरला. आपल्याला नवीन जागा घेऊन तिथे काहीतरी व्यवसाय चालवावा, अशा विचारात तो होता. परंतु त्याच्याजवळ आर्थिक भांडवल पुरेसे नव्हते. यामुळे त्याने आपल्या घरातूनच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. तेवढ्यात महेशच्या कुटुंबियांनी घराचे बांधकाम काढले. दरम्यान महेशने कुटुंबियांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला विरोध झाला. मात्र त्याचा हट्ट पाहून सगळ्यांना त्याला दुजोरा दिला. 

कुटुंबियांचीही साथ 
तो स्वत: अभियंता असल्याने कोरोनाच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञान वापरून कमी खर्चात स्वतःच इंटेरियर डिझाईन केले. " हरे कृष्णा' नावाचे कॅफे त्याने चालू केले. सुरवातीला महेशला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यातून शिकत शिकत त्याने विविध प्रकारच्या पिझ्झा व्हरायटी, मोमोज, मॉकटेल या सर्व गोष्टी स्वतःच बनवायला सुरवात केली. शहरातील युवकांना त्याने बनवलेल्या पदार्थांचे आकर्षण आहे. सर्वसामान्य तरुणवर्गाच्या खिशाला परवडेल एवढेच दर त्याने ठेवले. चवही तितकीच उत्कृष्ट देण्याचा प्रयत्न तो करत आहे. या व्यवसायात घरातील सर्व कुटुंबाची साथ त्याला मिळत आहे. 


व्यवसायाच्या भूमिकेवर ठाम 
मला व्यवसायच करायचा आहे. या भूमिकेवर मी ठाम राहिलो आणि आज मला माझ्या या व्यवसायातून आर्थिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे समाधान आहे. आई, भाऊ आणि बहिण यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे ते सर्व श्रेय मी त्यांनाच देतो. 
-महेश मिठ्ठा, युवक व्यवसायिक, सोलापूर  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT