सोलापूर

करमाळा तालुक्यातील सहा आठवडा बाजार कधी सुरू होणार ?

सकाळ वृत्तसेवा

केतूर(सोलापूर)ः महामारी कोरोनामुळे सुरू असलेल्या व वरचेवर वाढत असलेल्या लॉकडाउन व संचारबंदीची झळ आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत आहे.परिणामी शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे चाकही रूतले गेले आहे. ग्रामीण भागातील भरणारे आठवडी बाजार बंद असल्यामुळे आर्थिक चक्र थांबले आहे. व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. 

ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था प्रामुख्याने गावातील बाजारपेठेवर अवलंबून असते. विशेषतः आठवडे बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात होते. तालुक्‍याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावात काही प्रमाणात रोजच भाजीपाला मंडई भरते. करमाळा तालुक्‍यातील केम, केतूर, जेऊर, साडे, जिंती, कोर्टी आदी मोठ्या गावात आठवडा बाजार भरतो. या बाजारात शेजारील दहा गावाबरोबरच वाड्यावस्त्यांची सोय होते. 

आठवडा बाजारात स्थानिक व्यवसायाबरोबरच अन्य ठिकाणचे छोटे व्यावसायिक त्यांची दुकाने लावतात. भाजीपाला, फळे, कापड, धान्य, चप्पल, कटलरी साहित्य, शालेय साहित्य, खेळणी आदींची खरेदी विक्री होऊन सर्वांची सोय होते. छोट्या विक्रेत्यांनाही दोन पैसे पदरात पडतात. परंतु,गेल्या अडीच- तीन महिन्यापासून ग्रामीण भागातील भरणारे आठवडा बाजार बंद आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन असल्याने व वरचेवर ते वाढतच असल्याने छोट्या व्यावसायिकांची मात्र पंचायत झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांचे हाल सुरू झाले आहेत. व्यवसाय बंद असल्याने उत्पन्नाचे मार्ग बंद झाले असून मात्र कमाईशिवाय घर खर्च चालवणे अशक्‍य होऊ लागले आहे. हे आणखी किती दिवस चालणार? हे मात्र कोणीही सांगू शकत नसल्याने अडचणीत भरच पडली आहे. 
सध्या लॉकडाउनमध्ये थोडी सवलत दिल्याने शहरी भागातील सर्व व्यवहार जवळजवळ सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातील आठवडे बाजारही सुरू करण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT