सोलापूर

बेपत्ता मुली अन्‌ महिला गेल्या कुठे?; पोलिसांनाही लागेना शोध

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सरत्या वर्षात (२०२१) सोलापूर शहरातून(solpaur city) १८ वर्षांखालील २४ मुले आणि २०९ पुरुष तर २३ अल्पवयीन मुली आणि १८ वर्षांवरील तब्बल ४०९ महिला, असे एकूण ६६५ जण बेपत्ता झाले आहेत. न सापडलेल्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या बरोबरीनेच पालकांचेही प्रयत्न सुरु आहेत. तरीही, त्यापैकी २६५ लोक अजूनपर्यंत सापडलेले नाहीत. ते गेले कुठे, असा प्रश्‍न पालकांच्या मनात असून पोलिसांच्या माध्यमातून ते त्या प्रश्‍नाचे उत्तर शोधू लागले आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्याची वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे शाळा बंद राहिल्याने ऑनलाइन शिक्षणासाठी महागडा मोबाइल घेऊन देणेही काहींना शक्‍य झाले नाही. दुसरीकडे कोरोना काळात अनेकांचा जॉब गेला, हाताला काम राहिले नाही. त्यामुळे कौटुंबिक वादाचे प्रसंगही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. एका वर्षांत जवळपास ७०० तक्रारींची नोंद महिला सुरक्षा कक्षाकडे झाली. त्यातील काहींवर सकारात्मक मार्ग निघाला तर काहींचे प्रकरण पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून न्यायालयात गेले. दुसरीकडे महिला, मुली, अल्पवयीन मुले, तरुण, पुरुषही बेपत्ता झाल्याची चिंताजनक बाब समोर आली. त्यातील अनेकांनी ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ म्हणत पलायन केल्याची बाब पोलिस तपासात समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ज्यांचा शोध लागला नाही, त्यांचा सायबर पोलिस, स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून शोध सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

बेपत्ता झालेल्या बहुतेक मुले, मुली, महिला, पुरुषांचा शोध लागला असून न सापडलेल्यांचाही शोध सुरु आहे. ‘ऑपरेशन मुस्कान’च्या माध्यमातूनही सातत्याने अल्पवयीन मुलांचा शोध घेतला जातो.

- हरीष बैजल, पोलिस आयुक्‍त, सोलापूर

पालक झिजवतात पोलिस ठाण्यांचे उंबरठे

अल्पवयीन मुलगी, मुलगा, विवाहाला आलेली मुलगी, विवाह झालेली सून, मुलगी, मुलगा काही कारण सांगून अथवा काहीही न सांगताच घरातून निघून गेले. त्यांच्या चिंतेतून पालकांनी पोलिस ठाणे गाठले. काहींना शोधण्यात पोलिसांना यश आले, काहीजण पुन्हा परत आले, मात्र काहीजण अजूनपर्यंत सापडेलच नाहीत. त्यांचा शोध लागला का, याची विचारणा करण्यासाठी बेपत्ता झालेल्यांचे पालक पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजवत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT