house burnt 
सोलापूर

एका उंदराने संपूर्ण कुटुंबाचा केला घात, घर आणि ऊस भस्मसात !

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सकाळी देव्हाऱ्यात पूजा करताना दिवा पेटवून शेतातील कामासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरी उंदराने पेटत्या दिव्याची वात पळवल्याने दुपारी घर पेटून उठले. यामुळे शेतकरी कुटुंबाचे संसार भस्मसात झाले. ही दुर्दैवी घटना मिरगव्हाण (ता. करमाळा) येथे घडली. 

मिरगव्हाण येथील अप्पा वायसे यांचे कुटुंब अतिशय धार्मिक आहे. शेतात काम करून दुपारी घरातील मंडळी परत आली असताना एका कोपऱ्यात घर पेटल्याचे दिसून आले. त्यादरम्यान अप्पा वायसे, त्यांची पत्नी, वडील आणि दोन मुले घरात होती. एका कोपऱ्याला घर पेटलेले हे शेजारच्या लोकांनी पाहिले आणि ते शेजारी ओरडत आल्यावर त्यांनी वायसे कुटुंबातील लोकांना कोपऱ्याला घर पेटले असल्याचे सांगितले. आग लागल्याचे समजताच सर्वांनी घराबाहेर धाव घेतली. 

अप्पा वायसे हे अतिशय धार्मिक कुटुंब असून, काल सोमवार असल्याने वायसे पती- पत्नीचा उपवास होता. सकाळी पूजा केल्यानंतर देव्हाऱ्यात असलेल्या दिव्याची वात उंदराने पळवली आणि घराला आग लागली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिक आग विझवण्यासाठी धावले. मात्र वेगाने सुटलेल्या वाऱ्यामुळे आग जास्तच भडकली. आग लागल्यानंतर मौल्यवान सामान बाहेर काढायची धडपड सुरू असतानाच आग भडकली आणि सर्वांना बाहेर पळावे लागले. वाऱ्यामुळे अप्पा वायसे यांच्या घराशेजारी असलेल्या त्यांच्या भावाच्या घरालाही आग लागली आणि ही आग समोरच्या दोन एकर उसालाही लागली. यात अंदाजे दोन लाखांचा ऊसही जळून गेला. 

या आगीत अप्पा वायसे यांचा मोठा मुलगा मयूर आणि लहान मुलगा महेश या दोघांच्या महत्त्वाच्या कागदपत्रासह जमीन व इतर महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेली. दरम्यान दोन दिवसांपूर्वी विकलेल्या उडदाचे अडीच लाख रुपयेही जळून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

IPL 2026: पंजाब किंग्सच्या मार्गातील मोठी 'अडचण' दूर! LSG साठी पाचशेहून अधिक धावा करणारा फलंदाज संघाबाहेर

Crime: अल्पवयीन भाचीची छेड काढली, नंतर पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मामाला एकट्यात गाठलं अन्... ठाण्यात रक्तरंजित थरार

Marathi Live News update: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT