Wife murdered for not paying Money for alcohol 
सोलापूर

दारूच्या नादात पत्नीच्या जीवावर उठला 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (जि. सोलापूर) ः दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या एकाने पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्याने तिचा निर्घृण खून केला. ही घटना पंढरपूर तालुक्‍यातील तुंगत येथे मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. 
या घटनेची पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तुंगत येथील अशोक पवार (वय 50) याला दारूचे व्यसन आहे. मंगळवारी रात्री जेवण करण्यापूर्वी त्याला दारू प्यायची होती. दारू आणण्यासाठी त्याने पत्नी विजया पवार (वय 45) हिच्याकडे पैशाची मागणी केली. पत्नीने दारूसाठी पैसे न दिल्यामुळे चिडलेल्या अशोक पवार यांनी कोयत्याने पत्नी विजया हिच्यावर वार करून तिचा निर्घृण खून केला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास विजया पवार हिचा खून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन तपास सुरू केला. या खूनप्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी संशयित आरोपी अशोक पवार यास ताब्यात घेतले असून पोलीस निरीक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: झूमरची लाईट बंद म्हणजे ‘नो एंट्री’; ‘इशाऱ्यावर चालणारा’ स्टाफ... अशोक खरातच्या ‘कोड वर्ड’मागचं घाणेरडं सत्य उघड!

दिव्यांगांसाठी मोठा निर्णय! महाराष्ट्रात २१ श्रेणींना सरकारी योजनांचा लाभ मिळणार; राज्य सरकारची ऐतिहासिक घोषणा

Sangli : गाजावाजा न करता लग्न उरकण्याची अट, पहिल्याच रात्री नवरी पळाली; नवरदेवाला १० लाखांचा चुना

"आताच्या मुली तीन लाख रुपये पर डे घेतात आणि आम्ही.." उषा नाडकर्णींनी व्यक्त केली नाराजी; म्हणाल्या...

Latest Marathi News Live Update : शेतीच्या वादातून थोरल्या भावाने वडिलांबरोबर धाकट्या भावालाही मारून टाकलं

SCROLL FOR NEXT