Madha Constituency BJP leader Dhairyasheel Mohite-Patil
Madha Constituency BJP leader Dhairyasheel Mohite-Patil esakal
सोलापूर

Loksabha Election : भाजप निंबाळकरांचं तिकीट कापणार? मोहिते-पाटलांच्या 'या' घोषणेमुळं राजकीय चर्चांना उधाण

सकाळ डिजिटल टीम

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेसाठी भाजपने आपल्याला तयारी करायला सांगितले आहे.

अकलूज : भाजपचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite-Patil) यांनी माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा मंगळवार दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर केली. मोहिते-पाटील यांच्या निवडणूक लढविण्याचे घोषणेमुळे मतदारसंघातील राजकीय चर्चांना वेग आला आहे.

भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsingh Naik Nimbalkar) हे देखील येथून निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे भाजप माढा मतदारसंघातील उमेदवारीबाबत सुवर्णमध्य कसा काढणार याकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून मोहिते-पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ’आमचे ठरलंय... खासदारच’ अशा स्वरूपाच्या पोस्ट करत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी याबाबत आग्रह धरला होता. मात्र दिवाळीचा मुहूर्त साधत धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रथमच आपण इच्छुक असल्याचे जाहीर केले. माढा मतदारसंघाची उमेदवारी हा आपला हक्कच असून पक्षाकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

लोकसभा मतदारसंघाच्या फेररचनेनंतर माढा मतदारसंघाची निर्मिती झाली. २००९ ची निवडणूक ज्येष्ठनेते शरद पवार यांनी लढविली आणि निवडून येत केंद्रात कृषिमंत्री झाले. त्यानंतरच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी (भाजप) लाट असतानाही विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपकडून फलटणचे  रणजितसिंह नाईक-निंबाळकर  यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली. निंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते-पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. माळशिरस तालुक्यातून सव्वालाखाचे मताधिक्य देत त्यांना निवडून आणले होते.

विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेसाठी भाजपने आपल्याला तयारी करायला सांगितले आहे, असे सांगत त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. नाईक निंबाळकर हे माढ्यातून लढण्याबाबत ठाम आहेत तर धैर्यशील मोहिते पाटील यांनीही इच्छुक असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजप माढ्याचा सुवर्णमध्य कसा काढणार याकडे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: मविआचा फॉर्म्युला ठरला?, कुणाला मिळणार किती जागा, जागावाटपाबाबत निकष काय?

Rohit Pawar: "अधिवेशन होऊ दे...फंड मिळू दे…आम्ही विचार करु", कोणाला पक्षात घ्यायचं याबद्दल रोहित पवार स्पष्टच बोलले

Latest Marathi Live Updates : दार्जिलिंग रेल्वे अपघातात 8 जणांचा मृत्यू, 50 जण जखमी; बचावकार्य पूर्ण

Goa Monsoon Trip: सोनेरी वाळू अन् रूपेरी लाटा.... 'या' 5 कारणांमुळे पावसाळ्यात गोवा ट्रिप बनवू शकता खास

IND vs AFG : सुपर-8च्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये मोठा बदल... 'या' स्टार खेळाडूची होणार एंट्री?

SCROLL FOR NEXT