Sharad Pawar esakal
सोलापूर

Baramati : दुधाच्या दरात वाढ; पवारांनी शेतकऱ्यांसमोरच फिरवला मुख्यमंत्री कार्यालयात फोन, मागितली शिंदेंची वेळ

पवारांनी दूध दराच्या प्रश्नासंदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांशी सखोल चर्चा केली.

महेश पाटील

उत्पादन खर्चापेक्षा कमी दर दूध उत्पादकांना मिळत असल्याने शेतकऱ्यांचा पारंपारिक जोडधंदा असलेला हा व्यवसाय आतबट्यात आला आहे.

सलगर बुद्रुक (सोलापूर) : दूध दरवाढीच्या (Milk Price Hike) प्रश्नासंदर्भात जाणकार दूध उत्पादकांना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलं. बारामती (Baramati) येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी त्यांनी दूध उत्पादकांशी चर्चा केली.

दुधाच्या दरातील घसरणीमुळं राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च जवळपास 35 रुपये येवढा आहे. आणि शेतकऱ्यांना 32 ते 33 रुपये एवढाच दूध दर मिळत आहे. त्यामुळं उत्पादन खर्चापेक्षा कमी दर दूध उत्पादकांना मिळत असल्याने शेतकऱ्यांचा पारंपारिक जोडधंदा असलेला हा व्यवसाय आतबट्यात आला आहे. त्यामुळं या सर्व समस्या घेऊन अडचणीत आलेल्या मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं आज पवारांची बारामतीत भेट घेतली.

यावेळेस पवारांनी दूध दराच्या प्रश्नासंदर्भात दूध उत्पादक शेतकऱ्यांशी सखोल चर्चा केली. सर्व शेतकऱ्यांची चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांसमोरच मुख्यमंत्री कार्यालयात दूरध्वनी वरून संपर्क साधला व मुख्यमंत्र्यांची वेळ घेतली. येत्या दहा ते पंधरा दिवसांत या प्रश्नावर मुखमंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असं पवारांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सांगितलं. यावेळी कृषिभूषण अंकुश पडवळे, माजी शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत, शिवाजी चव्हाण, इंद्रजित पवार, दादासोा पवार आदी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पवारांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT