Woman dies after being crushed in threshing machine in Madha taluka 
सोलापूर

सोयाबीनचे खळे बेतले जिवावर; माढा तालुक्‍यात मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू 

वैभव देशमुख

मानेगाव (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील बुद्रुकवाडी येथे आज दुपारी दोनच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. यामध्ये मळणी यंत्रावर सोयाबीन करत असताना मशीनमध्ये जाऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एवढी भयानक होता, की त्या महिलेचे पूर्ण डोकेच चेंदामेंदा झाले होते. शेजाऱ्यांचे सोयाबीन खळे करायला गेल्या अन्‌ ते खळेच जिवावर बेतले, अशीही दुदैवी घटना घडली. 
ग्रामीण भागात सध्या सोयाबीन, उडीद हंगाम जोरात चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ चालू आहे. अती धावपळ जिवावर बेतू शकते, याचा परिचय आज आला. 
याबाबत अधिक माहिती अशी, की बुद्रुकवाडी येथील विमल विलास आतकरे (वय 48) यांच्या शेजारील शेतामध्ये सोयाबीनचे खळे चालू होते. त्यावेळी विमल आतकरे या स्वतःच्या शेतामध्ये काम करत होत्या. त्या काम करत असताना शेजारच्या शेतामध्ये सोयाबीन करायला मशीन आली व माणसे नसल्याने विमल आतकरे यांना सोयाबीन करू लागण्यासाठी शेजारील श्री. दळवे यांनी आमच्या इथे थोडा वेळ, या असे सांगितले. त्यावेळी विमल त्या ठिकाणी आल्या व सोयाबीन करण्यासाठी मदत करून लागल्या. तीनच पोते सोयाबीन झाले, तोपर्यंत ही घटना घडली. सोयाबीन करत असताना त्यांच्या डोक्‍याला बांधलेला स्कार्प मळणी यंत्रामध्ये अडकला. स्कार्प अडकल्यानंतर मशीनचा वेग एवढा होता, की यावेळी विमल यांचे डोके, त्या मशीन मध्ये जाऊन चेंदामेंदा झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. बुद्रुकवाडी येथील विलास आतकरे यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पती, सासू, सासरे असा परिवार आहे. या घटनेनंतर मानेगांव परिसरावर मोठी शोककळा पसरली आहे. 
सध्या मोठ्या प्रमाणात शेतीची कामे चालू असल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. परगावातून आलेल्या महिलांना तीनशे व पुरूषांना चारशे रूपये मजुरी द्यावी लागत आहे. म्हणून सर्वजण घरीच शेजारी, मित्र यांना एकमेकाकडे कामासाठी बोलवून काम उरकत आहे. व त्यातूनच घाई गडबडीत अशा घटना घडून त्या जिवावर बेतत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संपादन : वैभव गाढवे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT