cyber_crime 
सोलापूर

ऍप डाउनलोड केले अन्‌ बॅंक खात्यातून दीड लाख गेले ! 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महिलेला मोबाईलवर ऍप डाउनलोड करण्यास सांगून अज्ञात व्यक्तीने त्या महिलेच्या खात्यातून 1 लाख 52 हजार 895 रुपये ट्रान्स्फर करून महिलेची फसवणूक केली. याबाबत प्रज्ञा प्रमोद सुरवसे (वय 38, रा. सुदेष्णा विहार, सात रस्ता, सोलापूर) या महिलेच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रज्ञा सुरवसे यांच्या घरातील मिक्‍सर बंद पडल्याने दुरुस्तीसाठी त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन लावला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला व समोरून बोलणाऱ्या व्यक्‍तीने दुरुस्तीसाठी येणाऱ्या व्यक्तीसाठी 10 रुपये चार्ज लागेल व ते पैसे क्‍यूएस या ऍपवरून पैसे पाठविण्यास सांगितले. त्या वेळी सुरवसे यांनी क्‍यूएस ऍप डाउनलोड करून माहिती भरत असताना संशय आल्याने त्यांनी नेट बॅंकिंग करण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात त्या अनोळखी व्यक्तीने सुरवसे यांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 52 हजार 895 रुपये ट्रान्स्फर करून त्यांची फसवणूक केली. म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय पाटील तपास करीत आहेत. 

पैशाच्या कारणावरून महिला व मुलास मारहाण 
पैशाच्या कारणावरून महिलेस व तिच्या मुलास मारहाण करणाऱ्याविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिदानंद अण्णाराव चिक्‍कळे (वय 39, रा. कल्याण नगर भाग दोन, जुळे सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर जळकोटे (वय 21, रा. कल्याण नगर भाग दोन, जुळे सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिदानंद चिक्‍कळे यांनी सागर जळकोटे याच्या घरी वायरिंगचे काम केले होते. त्या कामाचे पैसे जळकोटे याच्याकडे राहिलेले होते. ते पैसे मागण्यासाठी चिक्‍कळे हे जळकोटे याच्या घरी गेले असता जळकोटे याने चिक्‍कळे व त्याच्या आईला मारहाण करून जखमी केले. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक श्री. वाल्मीकी तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT