Of "that" woman in Laul Relatives report negative 
सोलापूर

लऊळमधील "त्या' महिलेच्या नातेवाइकांचे अहवाल निगेटिव्ह

सकाळ वृत्तसेवा

कुर्डू (जि. सोलापूर) ः लऊळ (ता. माढा) येथील कोरोना मृत 39 वर्षीय महिलेच्या सहा नातेवाइकांच्या घेतलेल्या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आला असून डॉक्‍टर व कंपाउंडर यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठवणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. व्ही. पलंगे यांनी "सकाळ'ला दिली.


त्या महिलेचा पती, आई, वडील, मुलगा, सून, नात या नातेवाइकांना परांडा रोडवरील महिला शासकीय वसतिगृहात इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन व डॉक्‍टर व कंपाउंडर यांना होम क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यापैकी सहा नातेवाइकांचे स्बॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे आता डॉक्‍टर व कंपाउंडरचा अहवाल काय येतो, याविषयी तर्कवितर्कला उधाण आले आहे.


मृत महिलेला कोरोना विषाणूची लागण कोणामुळे झाली, याची चौकशी प्रशासन कसून करत आहे. अद्याप ही माहिती न समजल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आहे. "त्या' महिलेला कोरोनाची लागण कधी, कुठे झाली, याच्या तपासाचे प्रशासनासमोर आव्हान आहे. दुसरीकडे नातेवाइकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला.


कोरोना विषाणूची संसर्गाने लागण होत आहे, हे आरोग्य विभागामार्फत सांगितले जाते. यावरून या महिलेच्या संपर्कातील घरातील सदस्य, नातेवाइकांना अशी कोणाला तरी लागण होण्याची शक्‍यता होती.


मृत महिलेच्या नातेवाइकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने तीन जून रोजी लऊळ, टेंभुर्णी येथील दोन दवाखान्याच्या माध्यमातून त्या महिलेच्याच्या तपासणीनंतर लऊळ, पडसाळी, अरण, उजनी, भेंड, परिते, पिंपळखुंटे, भुताष्टे, व्होळे खु., बावी, मोडनिंब, म्हैसगाव, कुर्डुवाडी, कुर्डू, दहिवली, टेंभुर्णी, मळेगाव, नगोर्ली, शिराळ, कंदर, आलेगाव, उपळवाटे, बार्डी, मोडनिंब, बिटरगाव, नगोर्ली, सांगवी, वरवडे, तांबवे, परिते, शेवरे, मळेगाव या गावांतील 130 रुग्णांसह नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT