Akluj Canva
सोलापूर

"हे सरकार काय मासिक श्राद्ध घालायची वाट बघतेय का?'

"हे सरकार काय मासिक श्राद्ध घालायची वाट बघतेय का?'

शशिकांत कडबाने

अकलूज-माळेवाडी ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी तीनही गावांच्या नागरिकांनी 22 जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे.

अकलूज (सोलापूर) : तीनही गावांची पुरुष मंडळी सरकार विरोधात प्रचंड आक्रमक झाली असताना आजवर महिलांनी पुरुषांना थोपवले. पण आत्ता महिलाच शांत बसणार नाहीत. तीव्र आंदोलन करतील. महिलांची आक्रमकता सरकारला महागात पडेल आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. उपोषणाच्या दहाव्या दिवशी उपोषणकर्त्यांकडून सरकारचा दहावा तर रविवारी तेरावा घालण्यात आला तरी सरकारला जाग येत नाही. आता हे सरकार काय मासिक श्राद्ध घालायची वाट बघतेय का, असा प्रश्न जिल्हा परिषद सदस्या शीतलदेवी मोहिते-पाटील (Zilla Parishad Member Sheetal Devi Mohite-Patil) यांनी उपस्थित केला. (Women in Akluj are becoming aggressive against the state government)

अकलूज (Akluj) - माळेवाडी (Malewadi) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत व नातेपुते (Natepute) ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याच्या मागणीसाठी तीनही गावांच्या नागरिकांनी 22 जूनपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. आज (सोमवारी) उपोषणाचा चौदावा दिवस उजाडला तरी शासन आंदोलनाची दखल घेत नसल्याबाबत खंत व्यक्त करत पत्रकारांशी बोलताना शीतलदेवी मोहिते-पाटील पुढे म्हणाल्या, अकलूज येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणास चौदा दिवस झाले तरी दखल न घेणाऱ्या शासनाच्या विरोधात महिला आक्रमक होत तीव्र आंदोलन (Agitation) करणार असून, होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल.

या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील (Former Deputy Chief Minister Vijay Singh Mohite-Patil), जिल्हा परिषद सदस्या सुनंदा फुले, सरपंच पायल मोरे, नातेपुतेच्या सरपंच कांचन लांडगे, फातिमा पाटावाला, रेश्‍मा गायकवाड, रेश्‍मा तांबोळी, नीता शिवरकर, ज्योती फुले, वैष्णवी दोरकर, सीमा एकतपुरे, श्रद्धा जवंजाळ, लीना जामदार, उज्ज्वला जामदार, मनीषा ढवळे, वैशाली पोरे, लीना मुळे, संजय साठे, कासीम तांबोळी, उत्कर्ष शेटे आदी उपस्थित होते. रविवारी निराई मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था, दयावान प्रतिष्ठान, शिवधैर्य फाउंडेशन, अकलूज मशिनरी स्टोअर्स असोसिएशन, संत शिरोमणी नामदेव महाराज युवक व महिला संघटना, हिंदू खाटीक युवक संघटना, स्वामी विवेकानंद गणेश मंडळ, शिव गर्जना या संघटनांच्या वतीने उपोषणास पाठिंब्याचे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT