Women in Pandharpur get financial support in the corona crisis 
सोलापूर

कोरोनाच्या संकटात पंढरपुरातील महिलांना मिळाला आर्थिक आधार

भारत नागणे

पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे कापडी मास्कला मागणी वाढली आहे. मागणीच्या प्रमाणात मास्कचा पुरवठा करण्याचे काम पंढरपूर तालुक्‍यातील 30 महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु आहे. आतापर्यंत महिला बचत गटांनी सुमारे पाच हजार कापडी मास्क तयार करुन त्याची विक्री केली आहे. यातून ऐन कोरोनाच्या काळात बचत गटातील महिलांना जवळपास एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. येथील महिला बचत गटाच्या या उत्कृष्ठ कार्याची व तत्पर सेवेची दखल प्रशासकीय पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे, अशी माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रविंद्र घोडके यांनी आज सकाळशी बोलताना दिली. 

ग्रामीण जीवन उन्नत अभियाना अंतर्गत पंढरपूर तालुक्‍यात महिला बचत गटांची स्थापन केली आहे. शासनाच्या या उपक्रमातून महिला बचत गटांना विविध स्वयंरोजगार व लघू उद्योगासाठी प्रोत्साहान दिले जाते. गेल्या महिनाभरापासून देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवणे व मास्कचा वापर करणे हे दोनच सध्यातरी कोरोनाला दूर ठेवण्यासाठी प्रभावी उपाय असल्याने याबाबत प्रशासकीय पातळीवरुन देखील जनजागृती केली जात आहे. त्यातच येथील उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांनीही प्रत्येक ग्रामपंचायतींना मास्क वाटप करण्याचे आदेश दिले होते. 
त्यानुसार तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना मास्कचे वाटप करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे ऐन कोरोनाच्या काळात स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे. 
सध्या तालुक्‍यातील 30 महिला बचत गटातील सुमारे 100 हून अधिक महिला मास्क तयार करण्याचे काम करतात. दररोज जवळपास 600 ते 700 मास्क तयार करुन त्यांची विक्री केली जाते. बचत गटांनी तयार केलेल्या मास्कची 20 रुपये दराने विक्री केली जात आहे. मास्कचा दर्जा चांगला असल्याने मास्कला मागणी वाढली आहे. या महिलांनी आता पर्यंत सुमारे 5 हजाराहून अधिक मास्कची निर्मिती करुन त्याची विक्री केली आहे. त्यातून महिलांना जवळपास 1 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनामुळे सर्वत्र बंद असताना दुसरीकडे मात्र महिला बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम मिळाल्याने तालुक्‍यातील 100 हून अधिक महिलांना कोरोनात आर्थिक आधार मिळाल्याचेही गटविकास अधिकारी श्री. घोडके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT