The women who were treated in Pandharpur raised tension with Barshi Karmala Sangola 
सोलापूर

पंढरपुरात उपचार घेतलेल्या ‘त्या’ महिलेमुळे बार्शी, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माढ्याचे वाढले टेन्शन

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपुरातील एका नामांकित खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेली मोहोळ तालुक्यातील पेनुर- पाटकुल येथील महिला कोरोना बाधित आढळली आहे. या महिलेने 21 ते 24 एप्रिल दरम्यान पंढरपुरातील रुग्णालयात उपचार घेतला. त्या महिलेशेजारी या हॉस्पिटलमध्ये असलेल्या इतर लोकांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. या माहितीमध्ये माढा, पंढरपूर, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा, करमाळा व बार्शी या भागातील रुग्ण या महिलेसोबत उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.
त्या कोरोनाबाधित महिलेने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे टेंशन वाढविले असल्याची माहिती समोर आली आहे. माढा गावासह मोडनिंब, तुळशी, पंढरपूर तालुक्यातील आंबे, भोसे, वडाचीवाडी, तारापूर, कासेगाव, कोर्टी, खेड भोसे, करकंब,  सुस्ते, गादेगाव, वाडीकुरोली, तावशी, चळे, खर्डी, फुलचिंचोली व पंढरपूर शहरातील रुग्णांनी त्या महिलेसोबत उपचार घेतले आहेत.  सांगोला तालुक्यातील सांगोला शहर,  चिकमहुद, घेरडी, अजनाळे, मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा शहर, तळसंगी, मरवडे, बार्शी शहर, मोहोळ तालुक्यातील औंढी, पेनुर, सौंदणे, तेलंगवाडी येथील देखील रुग्ण या महिलेसोबत पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. करमाळा तालुक्यातील केम यासह जिल्ह्यातील विविध गावातील एकूण 61 रुग्णांची यादी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तयार केली आहे. हे ६१ जण ज्या गावातील आहेत त्या सर्व रुग्णांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. ही तपासणी करण्याबाबतची कार्यवाही संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने करायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT