Women's Day 2023 Organization of various competitions for women from 4th to 8th March solapur sakal
सोलापूर

Women's Day 2023 : महिला दिनानिमित्त जेऊर येथे 4 मार्च पासुन विविध स्पर्धा; ज्योतीताई पाटील

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारायण आबा पाटील मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन

आण्णा काळे

करमाळा : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नारायण आबा पाटील मित्र मंडळाच्या वतीने तालुक्यातील जेऊर येथे सलग 21 व्या वर्षी 4 ते 8 मार्च  दरम्यान महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्योतीताई पाटील यांनी दिली.

यावेळी महिला दिन महोत्सव संयोजन समितीच्या सदस्या  अनिता जगताप, रुक्मिणी कांडेकर,जरिना मुल्ला, मंगल गादिया,रेणुका दोशी, विजया भोसले, जयश्री दळवी,लता शिरस्कर,  यास्मीन शेख,  सुचीता राठोड, प्रेमलता दोशी, दोशी, शालीनी नुस्ते, धनश्री झांजुर्णे, वैशाली कोठारी,

श्वेता गादिया, अनिता लुणावत,साधना लुणावत,संगिता साळवे, रत्नमाला बादल,श्रीमती विजया करणवर, आदिसह संयोजिका व परिक्षक उपस्थित होत्या.या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना ज्योतीताई पाटील यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षांपासून जेऊर येथे होणाय्रा महिला दिनाच्या निमित्ताने जेऊर परीसरातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न असतो. 

4 ते 8 मार्च दरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यात शनिवारी ता. 4 मार्च रोजी फनी गेम्स, उखाणे स्पर्धा व अनूभव कथन स्पर्धा होणार आहे तर रविवार ता. 5 मार्च रोजी रांगोळी, मेहंदी व हस्तकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तर सोमवार ता.6 मार्च रोजी भारत महाविद्यालयाच्या वतीने महिलांची मोफत हिमोग्लोबीन तपासणी होणार आहे.

मंगळवारी ता. 7 मार्च रोजी डान्स व पाककला या स्पर्धा होतील. ता. 8 मार्च रोजी महिलांसाठी अंताक्षरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा काही आॅनलाईन स्पर्धा घेण्यात येणार असून यात माझे किचन सुंदर किचन, माझे घर सुंदर गार्डन तसेच महिलांनी व्हाटस्अॅप स्टेटस, इन्सटाग्राम व इतर सोशल मिडिया साठी तयार केलेल्या रिल्स,

स्टेटस व्हिडिओ आदिंची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडीओ अथवा रिल्स ता. 4 ते 7 मार्च दरम्यान स्विकारले जाणार असून यातुनच विजेत्यांची नावे काढली जातील. वरील सर्व स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना ता. 8 मार्च रोजीच्या बक्षिस वितरण सोहळ्यात आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

यंदा या स्पर्धेसाठी दोन गट तयार करण्यात आले असून पहिल्या गटात इयत्ता आठवी ते पदवी पर्यंतच्या मुलींचा समावेश आहे तर दुसरा गट हा फक्त महिलांसाठीच राखीव असणार आहे. या सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी जास्तीत जास्तं संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जोतीताई पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT