उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनीचा प्रश्‍न Sakal
सोलापूर

समांतर जलवाहिनीचे काम थांबवले; ब्लास्टिंगमुळे धरणाला धोका; ‘उजनी’च्या अभियंत्यांचे मनपा आयुक्तांना पत्र

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सुरू झालेले सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम पुन्हा थांबवावे लागले आहे. उजनी धरणापासून ७५० मीटर अंतरावर जलवाहिनीच्या पंपगृहाचे काम सुरू असून त्यासाठी संबंधित मक्तेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय दोनवेळा ब्लास्टिंग केले आहे.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून सुरू झालेले सोलापूर-उजनी समांतर जलवाहिनीचे काम तीनच दिवसात पुन्हा थांबवावे लागले आहे. उजनी धरणापासून ७५० मीटर अंतरावर जलवाहिनीच्या पंपगृहाचे काम सुरू असून त्यासाठी संबंधित मक्तेदाराने कोणत्याही परवानगीशिवाय दोनवेळा ब्लास्टिंग (विस्फोटन) केले आहे. त्यामुळे उजनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी ते काम तत्काळ थांबवले आहे.

समांतर जलवाहिनीचे काम हैदराबाद येथील पोचमपाड कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. २९ मेपासून कामाला सुरवात करण्यात आली आहे. सध्या उन्हाळा असल्याने उजनी धरण परिसरातील पंपगृहाचे (जॅकवेल) काम हाती घेण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर उजनी धरण व्यवस्थापन उपविभागाचे उपविभागीय अभियंता व शाखा अभियंत्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी उजनी धरणाच्या भिंतीपासून अवघ्या ७५० मीटर अंतरावर पाण्याकडील बाजूला खोदाई करताना अनियंत्रित स्फोटकांचा वापर करून ब्लास्टिंग केल्याची बाब समोर आली. २५ मे रोजी त्यासंदर्भातील सूचना देऊनही संबंधित मक्तेदाराने २६ व २७ मे रोजी दोनवेळा पुन्हा अनियंत्रित पद्धतीने ब्लास्टिंग केले आहे. त्यामुळे आता यापुढे धरण परिसरात ब्लास्टिंग करता येणार नाही.

ब्रेकरचा वापर करून त्याठिकाणचे काम पूर्ण करावे, असे पत्र उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी महापालिका आयुक्त शीलत तेली-उगले यांना धाडले आहे. अजूनही त्यासंदर्भातील लिखित ग्वाही महापालिकेकडून आलेली नसल्याने अद्याप काम बंदच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

महापालिका आयुक्तांना पाठविलेल्या पत्रातील बाबी...

  • - उजनी धरणाच्या भिंतीपासून ७५० मीटरवर ब्लास्टिंग करता येणार नाही

  • - मक्तेदाराच्या प्रतिनिधीला सूचना करूनही त्यांच्याकडून २६ व २७ मे रोजी पुन्हा अनियंत्रित स्फोटकांचा केला वापर

  • - पंपगृहाचे काम करण्यासाठी ब्रेकरचा वापर करावा; स्फोटकांच्या वापरामुळे धरणाला होऊ शकतो धोका

  • - अनियंत्रित विस्फोटकांचा वापर झाल्यास धरणाच्या भिंतीला तडे जातील आणि मोठी गंभीर समस्या निर्माण शकते

  • - संबंधित मक्तेदाराकडून यापुढे धरण क्षेत्रातील खोदकामासाठी विस्फोटन (ब्लास्टिंग) करण्यात येऊ नये, त्यांना तत्काळ आदेश द्यावेत

  • - कोणताही परवानगी नसताना पुन्हा अनियंत्रित स्फोटकांचा वापर केल्यास मक्तेदारावर कायदेशीर कारवाई केली जाईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Rate : सांगली जिल्ह्यातील आठ कारखान्यांची पहिली उचल 3900 ते 4000 रुपये जाहीर; जाणून घ्या कोणत्या कारखान्याचा किती दर? कोणी दिला सर्वाधिक दर?

Makarand Patil: अजित पवारांनी दिलेला शब्द राष्ट्रवादीने पाळला; उदयसिंह पाटलांना योग्य सन्मान, मकरंद पाटलांचे विधान

मालिकेत सावत्र आई-मुलगी, पण खऱ्या आयुष्यात बेस्ट फ्रेंड्स! 'कमळी' फेम गौरी-अनिकाचा भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : ओंकार हत्तीवरून ग्रामस्थ आणि वनकर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी

Bandra Accident: वांद्र्यात हिट अँड रन! वेस्टर्न एक्सप्रेसवेवर BMWने महिलेला उडवलं, जागीच मृत्यू; आरोपी व्यावसायिकाची जामिनावर सुटका

SCROLL FOR NEXT