सोलापूर

विठ्ठल कारखान्यासंबंधी गौप्यस्फोट

भारत नागणे

पंढरपूर  ः गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे यंदा धुराडे बंद पडले आहे. त्यामुळे कारखान्यातील बहुतांश कामगारांना "ले ऑफ' देण्यात आला आहे. गेल्या नऊ महिन्यांचा पगार थकीत असल्यामुळे कामगारांच्या आर्थिक अडचणीत आणखी भर पडली आहे. अशातच कारखान्याने कामगारांचा सुमारे तीन कोटी रुपयांचा भविष्य निर्वाह निधी भरला नसल्याची धक्कादायक बाब आता नव्याने समोर आली आहे. 
प्रतिदिन सुमारे 10 हजार टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्यात जवळपास 900 ते हजार कर्मचारी काम करतात. अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये कारखाना चालवला जातो, असा पूर्वीच्या काळी नावलौकिक होता. परंतु गेल्या 10 वर्षांपासून कारखान्याची आर्थिक उतरंड ढासळत आहे. प्रचंड आर्थिक विवंचनेनंतर व्यवस्थापनावर कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. 
कारखान्याचा एक गाळप हंगाम बंद ठेवल्यामुळे सुमारे आठशे ते हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढालही ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे कारखान्यातील कामगारांना ले ऑफ देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळी आली आहे. मागील वर्षातील सुमारे नऊ महिन्यांचा पगार अजूनही कारखान्याकडे थकीत आहे. पगार थकल्याने अनेक कामगारांना दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर म्हणून काम करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 
कामगारांची अशी दयनीय अवस्था असतानाच दुसरीकडे मात्र कारखाना व्यवस्थापनाने मागील सहा महिन्यांपासूनचा सुमारे तीन कोटी रुपयांचा भविष्य निर्वाह निधी सोलापूर येथील भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केला नाही. त्यामुळे याचाही मोठा आर्थिक फटका कामगारांना भविष्यात सहन करावा लागणार आहे. 

कामगारांचा सहा महिन्यांचा सुमारे तीन कोटी रुपयांचा पीएफ थकीत आहे. कारखान्याकडे पैसे उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे जमा केली जाणार आहे. पगार थकीत राहिल्याने पीएफची रक्कम थकली आहे. 
श्री. बेल्हेकर, कार्यकारी संचालक, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर 

कामगारांची पंढरपुरात बैठक 
विठ्ठल साखर कारखान्याचा गाळप हंगाम बंद असल्याने कारखान्यातील बहुतांश कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. अशातच त्यांचे गेल्या नऊ ते दहा महिन्यांचे वेतन थकले आहे. थकीत वेतनासह इतर बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी पंढरपुरातील संत पेठेत कामगारांची गुप्त बैठक झाली. या बैठकीत कारखाना संदर्भातील विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवाय थकीत वेतनासंदर्भात कामगारांचे एक शिष्टमंडळ लवकरच व्यवस्थापनाशी भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन देणार आहे. त्यानंतर वेतनासाठी लढा उभारण्याचा निर्णयही या बैठकीत झाल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT