Rangotsav 
सोलापूर

शेत शिवारात साजरा होतोय रंगोत्सव ! नवपालवी, फुलांनी केलीय निसर्गात रंगांची उधळण

मोहन काळे

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो तेव्हा शेत शिवारातील रंगपंचमी अनुभवायला मिळते. आज कोरोनामुळे रंगपंचमी साजरी करण्यास बंदी असली तरी निसर्गाने आपला क्रम चुकवला नाही. विविध प्रकारच्या वनस्पतींना फुटलेली चैतन्याची पालवी आणि फुलोरा पाहून या पृथ्वीवर निसर्ग जणू रंगांची उधळण करून रंगपंचमीचा उत्सवच साजरा करतोय, असेच दृश्‍य सध्या शिवारात दिसू लागले आहे. 

उन्हाळा सुरू झाला की, वातावरणात रखरख जाणवते. मात्र चैत्रपालवीने वातावरणातील रखरखीतपणा जातो आणि चैतन्य निर्माण होते. यातच वसंत ऋतूमध्ये विविध प्रकारच्या वनस्पतींना फुलांचा बहार आला आहे. यामध्ये पळस, पांगारा, काटेसावरीची फुले लक्ष वेधून घेत आहेत. तर शेतकऱ्यांना कीटकनाशक म्हणून उपयोगी पडणारा कडुनिंब इतक्‍या वर्षानंतर सगळीकडे फुलांनी लगडून गेला आहे. याच कामी येणाऱ्या करंजीची नवीन पानांची सळसळ वाढलीय तर फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याची विविधरंगी पालवी नेत्रसुखद वाटतेय. 

मक्‍याच्या कणसांची सोनेरी व तांबूस केसरे सूर्य किरणात न्हाऊन निघाली की चमकदार बनताहेत. मकेचा फुलोरा हवेच्या झोतामुळे या कसरावर पडताच परागीभवनामुळे कणसात टच्च दाणे भरतात. याच ऋतूमध्ये कडुनिंबाच्या झाडाच्या आधाराने वाढणारी गुळवेलाची लालबुंद फळांची माळ लक्षवेधक ठरतेय. मिरची, दोडका, काकडी व खरबुजांच्या फुलांवर मधमाशांचे गुंजन शेतकऱ्यांना फायदाच देतेय. अशा प्रकारे निसर्ग या अवनीवर रोजच रंगोत्सव साजरा करताना दिसतोय. त्यामुळे रंगहीन काहीही नसते, जगण्याचे विविध रंग मात्र अनुभवावे लागतात, हेच चित्र शिवारातही पाहायला मिळाले. 

अहो, वेलवर्गीय पीक असो वा फळझाडे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याच्या फुलांना अधिक महत्त्व असते. फलधारणेसाठी या विविध प्रकारच्या फुलांचा उपयोग होतो. त्यामुळे आम्हाला शेतात रोजच रंगपंचमी साजरी होताना दिसते. 
- संजय रितोंड, 
शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

Pune News : लग्नानंतर वर्षातच न्यायालयात जाणाऱ्याला दणका; न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

SCROLL FOR NEXT