World Book Day rakesh gaikwad make book world for readers knowledge sakal
सोलापूर

World Book Day : वाचनवेड्या माणसाने बनविले ‘ग्रंथविश्व’

जागतिक पुस्तक दिन विशेष; मंगळवेढ्यात गायकवाड यांची वाचन चळवळ

श्रीकांत मेलगे

मरवडे (जि.सोलापूर) : बदलत्या आधुनिक युगात सर्वांच्याच हातात पुस्तकाच्या जागी मोबाईल आले आहेत. मोबाईलमुळे घटकाभराची करमणूक होईल परंतु पुस्तके हीच जीवनाला आकार देणारी शिदोरी आहेत.

‘वाचाल तरच वाचाल’ हे कटुसत्य विसरून चालणार नाही, हे ध्यानी घेऊन मंगळवेढा येथील राकेश औदुंबर गायकवाड या प्राथमिक शिक्षक असलेल्या वाचनवेड्या माणसाने आपले घरचं ‘ग्रंथविश्व’ बनवून गेली २१ वर्षे वाचन चळवळ निरंतर सुरू ठेवली आहे.

थोर साहित्यिक विल्यम शेक्सपिअर व अन्य साहित्यिक यांच्या स्मृती जपण्यासाठी जागतिक पुस्तक दिन जगभरात साजरा होतो. माणसांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे व जगभरातील लेखक व पुस्तके यांचा सन्मान करणे हा मुख्य उद्देशसुद्धा यापाठीमागे आहे.

प्रत्येकात वाचनाची आवड निर्माण करणे, ही अविरत चालणारी प्रक्रिया असली तरी गेली २१ वर्षे मंगळवेढा येथील प्राथमिक शिक्षक राकेश गायकवाड हे आपल्या स्वर्गीय संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपण्याचे काम करीत आहेत.

लहानपणापासूनच वाचनाची आवड जपत असताना राकेश गायकवाड यांच्या भगिनी सविता व भाऊजी प्रा.संजय सातपुते यांचे २००० मध्ये अपघाती निधन झाले. वाचनावर नितांत प्रेम असणाऱ्या बहीण व भाऊजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गायकवाड गुरुजींनी ठाणे येथील मामा बाळासाहेब नागणे यांच्या प्रेरणेने व जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गुलाब पाटील, हजरत काझी, प्रा.शिवाजी काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली २००२ यावर्षी ‘ग्रंथविश्व’ या वाचनयज्ञास सुरुवात केली.

शाळकरी मुले वाचनाकडे वळावित यासाठी दत्तक शाळा योजना, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा, वर्षभर विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे उपक्रमही याठिकाणी राबविले जातात.

ग्रंथविश्वची वैशिष्ट्ये...

राकेश गायकवाड यांनी अत्यंत कल्पकतेने बनविलेली ‘ग्रंथविश्व’ ही इमारत पाहताक्षणी वाचकांचे लक्ष वेधून घेते. इमारतीच्या बिम, पिलर यांची पुस्तकाप्रमाणे रचना, त्यावर विविध प्रसिद्ध पुस्तकांची नावे, वाचन संस्कृतीची ओळख करून देणारे प्रवेशव्दार आहे.

ग्रंथविश्वमध्ये सोळा हजार पुस्तके, दररोज सोळा वृत्तपत्रे, पन्नासहून अधिक मासिक व साप्ताहिके, बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन, लेखनवर्गानुसार पुस्तकांची मांडणी, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह, विविध विषयांच्या कात्रणांचा संग्रह, परदेशी व भारतीय नाणी, पोस्टल तिकिटे यांचा संग्रह या सर्व गोष्टी प्रत्येकाची वाचन संस्कृतीशी नाळ घट्ट करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT