ATM sakal
सोलापूर

व्वा रे पठ्ठ्या! एकाच ATM सेंटरवर तीन ज्येष्ठांची फसवणूक; पैसे काढून देतो म्हणून ATM कार्ड बदलायचा, अन्‌

डफरीन चौकातील ‘एसबीआय’च्या एटीएम सेंटरवर २६ मे ते ८ जून या १३ दिवसांत तिघांच्या ‘एटीएम’ची अदलाबदल ७४ हजार २०० रुपये लंपास करणाऱ्या तरुणाला सदर बझार पोलिसांनी जेरबंद केले आहे. सिद्राम वाघमारे (रा. मोदी) असे त्या संशयिताचे नाव आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : डफरीन चौकातील ‘एसबीआय’च्या एटीएम सेंटरवर २६ मे ते ८ जून या १३ दिवसांत तिघांच्या ‘एटीएम’ची अदलाबदल ७४ हजार २०० रुपये लंपास करणाऱ्या तरुणाला सदर बझार पोलिसांनी जेरबंद केले आहे. सिद्राम वाघमारे (रा. मोदी) असे त्या संशयिताचे नाव आहे.

एकाच एटीएम सेंटरवर थांबून पैसे काढायला आलेल्या वयस्क व्यक्तींना हेरून त्यांना मदत करण्याचा बहाणा तो करायचा. ‘एटीएम’मध्ये कार्ड घालून तो त्या व्यक्तीला पासवर्ड टाकायला सांगत होता. त्यावेळी पासवर्ड लक्षात ठेवायचा आणि काही वेळाने पैसे निघत नाहीत म्हणून तो स्वत:कडील कार्ड त्यांना द्यायचा. पैसे काढायला आलेल्या व्यक्तीचे एटीएमकार्ड स्वत:कडे ठेवून घ्यायचा. त्याचवेळी तो संबंधित व्यक्तीला दुसऱ्या ‘एटीएम’मध्ये जायला सांगून तेथून पसार व्हायचा.

२६ मे रोजी दुपारी १२ ते एकच्या दरम्यान आपल्या ‘एटीएम’ कार्डची अदलाबदल करून दुसरेच कार्ड हाती सोपविल्याची फिर्याद वर्षा बाळासाहेब शिंदे (वय ६७, रा. न्यू लक्ष्मी चाळ, देगाव रोड) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यांच्या बॅंक खात्यातून ११ हजार २०० रुपये लंपास झाले होते. या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच ३१ मे रोजी तात्यासाहेब दामोदर जमदाडे (वय ६०, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर) यांचीही फसवणूक झाल्याचा गुन्हा सदर बझार पोलिसांत दाखल झाला. त्यांच्या बॅंक खात्यातील ४७ हजार १०० रुपये लंपास झाले होते.

अजून संशयिताचा शोध लागलेला नव्हता, पोलिसांकडून डफरीन चौकातील एटीएम केंद्रावर वॉच होता. तरीपण ६ जूनला बबिता शिवाजी गावडे (वय ४३, रा. एनजी मिल चाळ, मुरारजी पेठ) यांचीही त्याच एटीएमवर फसवणूक झाली. आपल्या बॅंक खात्यातून १५ हजार ९०० रुपये लंपास झाल्याची फिर्याद सदर बझार पोलिसांत दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयिताला जेरबंद केले.

संशयिताच्या डोक्यावर टोपी अन्‌ डोळ्यावर गॉगल

तात्यासाहेब जमदाडे, बबिता गावडे व वर्षा शिंदे यांनी सदर बझार पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सचिन माळी यांनी संशयिताचे वर्णन विचारले. त्यावेळी तिघांनीही सांगितले, त्याच्या डोक्यावर टोपी व डोळ्यावर गॉगल होता. पोलिसांनी डफरीन चौकातील त्या एटीएमवरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले. त्यानंतर मागील दोन दिवसांपूर्वी त्याला जेरबंद केले. सध्या सिद्राम वाघमारे हा संशयित पोलिस कोठडीत असून पोलिस कसून तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT