Yallamadevi 
सोलापूर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कासेगावची यल्लामादेवीची यात्रा रद्द !

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : राज्यासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कासेगाव (ता. पंढरपूर) येथील यल्लामा देवीची वार्षिक यात्रा रद्द करण्यात आली आहे. प्रतिकात्मक स्वरूपात यात्रेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेसाठी येऊ नये, असे आवाहन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. या संदर्भात बुधवारी (ता. 6) प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

या वेळी विजयसिंह देशमुख, वसंतराव देशमुख, प्रशांत देशमुख, तहसीलदार विवेक साळुंखे, पोलिस निरीक्षक किरण अवचर आदींसह इतर ग्रामस्थ व शासकीय अधिकारी उपस्थित होते. 

कासेगाव येथे जागृत यल्लामा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने अनेक राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 9 ते 11 जानेवारी दरम्यान भरणारी ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रे दरम्यान देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 

या वर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने अनेक यात्रा प्रशासनाने रद्द केल्या आहेत. यामध्ये आता कासेगाव येथे भरणारी यल्लामा देवीची यात्राही रद्द करण्यात आली आहे. मोजक्‍या मानकऱ्यांच्या उपस्थितीत यंदाची यात्रा प्रतिकात्मक स्वरूपात व कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन व प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून साजरी केली जाणार आहे. 

यात्रेत गर्दी होऊ नये यासाठी मंदिर परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. यात्रे दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT