This year, Gavaran mango has disappeared from the market 
सोलापूर

यंदा गावरान आंबा बाजारपेठेतून गायब

राजाराम माने

केत्तूर (करमाळा, जि. सोलापूर) : फळांचा राजा म्हणून आंब्याची संपूर्ण भारतभर ओळख आहे. मात्र, वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे यंदा गावरान आंबा चाखण्याची मज्जा मिळणार नाही.

गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी होते. डिसेंबर महिना सुरू होता तरी काही ठिकाणी पाऊस चालू होता. त्यामुळे थंडी लांबल्याने दरवर्षी इतका मोहर यंदा लागला नाही. ज्या थोडक्‍या झाडांना मोहर लागला तो झडून गेल्याने आंब्याच्या झाडाला यंदा फळधारणा झाली नाही. त्याचा यंदाच्या आंबा हंगामावर परिणाम झाला असून परिणामी त्यामुळे दरवर्षी एप्रिलमध्ये दाखल होणार गावरान आंबा यंदा निम्मा मे सरत आला तरी बाजारात दाखल झालेला नाही. 


मोहर लागल्यापासून ते पाड लागेपर्यंतच्या कालावधीत निसर्गाच्या अवकृपेमुळे आंब्याला या वर्षी चांगलाच फटका बसला. कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले असले तरी फळे व भाजीपाला विक्री सुरळीतपणे चालू आहे. करमाळा तालुक्‍यात संकरित आंबा बागांचे प्रमाण अत्यल्प असून उजनी धरण परिसरातील काही गावांतील शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर तर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आंब्याची लागवड केली आहे.

कोर्टी येथील राहुल बोलभट यांनी आपल्या शेतात 100 केशर, कलमी आदी जातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली. दरवर्षी फळ आल्यावर लाखभर उत्पन्न मिळते. परंतु यंदा खूप कमी फळ लागलं होत. पण ते फळ पण वादळी वाऱ्याने गाठले. त्यामुळे यंदा उत्पन्न मिळणार नसल्याचे श्री. बोलभट यांनी "सकाळ'शी बोलताना सागितले. 

यंदा लोणच्याच्या स्वादपासून मुकावे लागणार 
दरवर्षी घरोघरी आंबट कैरीचे पारंपरिक पद्धतीने लोणचं केलं जातं. मात्र, यंदा थंडी लांबल्याने मोहर लागला नसल्याने यंदाच्या आंबा हंगामावर परिणाम झाला असून परिणामी त्यामुळे दरवर्षी कडक उन्हामध्ये गावठी बाजारात दाखल होणारी गावरान आंबट कैरी यंदा मिळू शकली नाही. त्यामुळे घरोघरी केल्या जाणाऱ्या लोणच्याच्या बरणी यंदा मोकळ्याच दिसत आहेत. 

आंबा बागांचे यंदा दुहेरी नुकसान झाले असून कमी मोहर लागल्याने फळे अत्यंत कमी लागली. शिवाय गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी वाऱ्याने थोडे फार होते ते फळ गळून गेले. त्यामुळे यंदा आंबा उत्पादन मिळणार नाही, असे आंबा उत्पादकांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपूर्वी तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात आंबा पिकाबरोबरच केळी, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्याने आंब्याच्या झाडावरील आंबे पडून आंब्याची झाडे धोंडी झाली आहेत. त्यामुळे यंदा सर्वसामान्यांना आंबा खायला मिळणार का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT