The young man who came out of prison on parole made an important decision 
सोलापूर

पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या युवकाने घेतला महत्त्वाचा निर्णय 

अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (ता. माढा, जि. सोलापूर) : सध्या संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार पसरला असून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या विषाणूवर लस उपलब्ध करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले जात आहेत. निर्माण करण्यात येणारी लस प्राण्यांवर चाचणी करण्यात येत असल्याचे समजताच माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी येथे पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या एका युवकाने स्वतःचे शरीर स्वच्छेने कोरोना आजारावर उपचार संशोधनासाठी देण्यास तयार असल्याचे पत्र माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांना दिले आहे. 

कोरोनाचा महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढत चालला आहे. रुग्णांची संख्या वाढतच असल्याने शासन कोरोनाची लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहे. उपलब्ध होत असलेली ही लस प्राण्यांवर चाचणी करण्यात येत असल्याचे माढा तालुक्‍यातील कुर्डुवाडी येथील रहिवासी युवकास समजताच त्यांनी माढा तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे कोरोना आजारावर लस उपचार संशोधनासाठी मी माझ्या शरीराचा शासनाला स्वच्छेने वापर करण्यास तयार असून जर शासनाने मला अशी संधी उपलब्ध करून दिली तर मी माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे समजेन, तसेच देशासाठी, समाजहितासाठी माझे जीवन उपयोगी यावे असे प्रकर्षाने वाटते. तरी शासनामार्फत माझी सोय करावी अशा आशयाचे निवदेन दिले. तो सध्या कारागृहातून लॉकडाउन पॅरोलवर बाहेर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT