Vikram 
सोलापूर

मला पोलिस व्हायचंय ! चारा विकून शिक्षण घेणाऱ्या स्वावलंबी युवकाचे स्वप्न

प्रकाश सनपूरकर

सोलापूर : शाळेत शिकत असल्यापासून चारा विकण्याचे काम करीत युवकाने स्वतःचे शिक्षण मोठ्या जिद्दीने चालू ठेवले आहे. शिक्षण पूर्ण करून आता पोलिस भरतीमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न त्याने समोर ठेवले आहे. चारा विक्रीचे काम करून पदवी शिक्षणासाठी त्याने रात्रीचे कॉलेज सुरू केले आहे. आजही दिवसभर आजीसोबत चारा विकून रात्रीच्या वेळी कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी जातो. आपले पोलिस व्हायचे स्वप्न उराशी बाळगून घरालाही हातभार लावणाऱ्या युवकाचे नाव आहे विक्रम पाडुरंग तोरणे. 

देगाव येथील विक्रम पांडुरंग तोरणे याचे बालपण अगदी वेगळ्या संस्कारातून गेले. घरी शेती नसल्याने रोजच्या कमाईसाठी साऱ्या कुटुंबाची दिवसभर धावपळ असते. वडिलांचा ऍटोचा व्यवसाय आहे. घरात दोन बहिणी व आई हेही असतात. लहानपणी विक्रम जेव्हा शाळेत जायचा तेव्हा त्याची आजी सोलापूरला जाऊन आली की पाच-दहा रुपये खाऊला देत असे. आजी खाऊला पैसे कुठून आणते? ही जिज्ञासा विक्रमच्या मनामध्ये जागली. तेव्हा शाळेला सुटी मिळाली की तो आजीसोबत सोलापूर शहरात यायला लागला. त्याची आजी सुरवातीपासून चारा विक्रीचे काम करते. त्याचे काका रावसाहेब तोरणे यांचे रोजीरोटीच्या घाईत विक्रमचे शिक्षण खंडित होऊ नये याकडे कायम लक्ष असते. त्यासाठी वेळोवेळी शाळेची फी भरण्याचे काम ते विक्रमच्या वडिलांच्या बरोबरीने करतात. 

शाळेत असताना शाळेचा वेळ संपला की आजीसोबत विक्रम चारा विकतो. सुटीच्या दिवशी तर दिवसभर हेच काम करतो. आठवीला गेल्यावर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला. केवळ शाळा व आजीसोबत चारा विकणे असाच दिनक्रम सर्व शालेय जीवनात विक्रमचा होता. दहावीनंतर अकरावीसाठी कॉलेजला ऍडमिशन घेतले. बारावीची परीक्षा आली तेव्हा विक्रमने चांगला अभ्यास केला. पण निकालाच्या दिवशी पाहिले की त्याच्यासोबतचे अनेक मित्र बारावीला नापास झाले होते. आपणही नापास झालो की काय, ही मनात भीती होती. तेव्हा निकाल पाहिला तर चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला होता. चारा विक्रीमध्ये खंड न पडू देता त्याने शिक्षण सोडायचे नाही, हे ठरवले. 

चारा विक्रीचे काम करून पदवी शिक्षणासाठी त्याने रात्रीचे कॉलेज सुरू केले. आजही दिवसभर आजीसोबत विक्रम चारा विकून रात्रीच्या वेळी कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी जातो. या वर्षी कोरोनामुळे महाविद्यालय सुरू झालेले नाही. त्यामुळे दिवसभर चारा विक्रीत तो व्यस्त असतो. कला शाखेच्या पदवीचे त्याचे हे दुसरे वर्ष आहे. पदवीनंतर आता पोलिस भरतीमध्ये सहभागी होऊन पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्यासाठी आता भरती सरावाची तयारीही त्याने सुरू केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT