Young work up in the background of Corona 
सोलापूर

शिल्लक वेळेत तरुण शिकतात "हे' काम 

विजयकुमार कन्हेरे

कुर्डुवाडी (सोलापूर) : "मी पोहे करायला शिकलो.., मला भाजी फोडणी टाकता येते...' ही वाक्‍ये लॉकडाउन काळातील काही तरुणांची आहेत. या कालावधीत काही तरुण स्वयंपाकघरात अनेक सोपे पदार्थ तयार करण्याच्या पद्धती शिकत आहेत. 
"कोरोना' पार्श्‍वभूमीवर संचारबंदीने सर्वजण घरातच आहेत. जेवण, झोप, टीव्ही, मोबाईल, वाचन, काही कामे या व्यतिरिक्त पुरुषांचा बराचसा वेळ शिल्लक असतो. घरातील स्त्रियांचा बहुतांश वेळ स्वयंपाकघरात जातो. चहा, कॉफी आदी साधारणपणे सर्वांना येतातच. काम नसल्याने, कॉलेज नसल्याने शिल्लक वेळेत काही तरुण स्वयंपाकघरात आईकडून खाद्यपदार्थ करावयाची पद्धत शिकत आहेत. अनेक पती पत्नीकडून काही खाद्य पदार्थ बनवण्याची रेसिपी शिकून प्रयोग करताना दिसत आहेत. पोळीचा आकार गोल करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. सोपे पदार्थ शिकण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. शिक्षण, नोकरीनिमित्त अन्य ठिकाणी असलेले अनेक तरुण संचारबंदी लागू होण्यापूर्वी घराकडे आले. लॉकडाउन असल्याने सुरवातीला काही दिवस निवांत गेले. परंतु, काही दिवसानंतर शिल्लक वेळेत अनेकांनी घरात आईला स्वयंपाकघरात मदत करण्यास सुरवात केली. पत्नीला स्वयंपाकघरात पती मदत करत आहेत. विशेषतः नाश्‍ताकरिता आवश्‍यक रेसिपी शिकत आहेत. काहीजण तर इंटरनेटद्वारे माहिती घेऊन नवीन पदार्थ करण्याचे प्रयत्न करत आहेत. 
आशुतोष कदम म्हणाला, मी कांदेपोहे करायला शिकलो. सध्या पोळी गोल लाटण्याचा प्रयत्न करत आहे. 
पूर्वा कुलकर्णी म्हणाले, माझा मुलगा छान, स्वादिष्ट उपमा करायला शिकला. तो मला स्वयंपाकघरात मदत करतो. 

हे पदार्थ बनवण्यासाठी प्राधान्य 
पोहे, उपमा, शिरा, भजी, बटाटा वडा, फिंगर चिप्स, शाबुदाणा खिचडी, सोप्या भाज्या, पोळ्या लाटणे, पोळ्या भाजणे, फळांचा ज्युस करणे, सॅलड तयार करणे, भेळ आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT