सोलापूर

कोरोना : पोटात काहीच नसताना तीन दिवस ते तसेच चालले

प्रशांत देशपांडे

सोलापूर कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन असल्याने पुण्यातील कित्येक खासगी कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. कंपन्या बंद असल्याने सध्या रोजगार बंद आहे. त्यामुळे पुण्यात राहून काही उपयोग नाही. जवळचे पैसेही संपत आल्याने तमिळनाडूतील जवळपास 200 तरुणांनी थेट तमिळनाडूचा पायी जाण्यासाठी मार्ग पकडला आहे. 

तीन दिवस चालून थकल्यानंतर त्यातील काहीजण आजारी पडले आहेत. त्यामुळे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ते तपासणीसाठी आले आहेत. तमिळनाडूतून पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक तरुण पुणे व मुंबई येथे कामासाठी जात आहेत. पण सध्या कोरोनामुळे सर्व वाहतूक बंद आहे. त्यातून गावाकडे जायचे कसे असा प्रश्‍न त्यांच्यापुढे आहे. त्यातून त्यांनी चालत जाण्याचा मार्ग निवडला. तीन दिवस चालल्यानंतर ते सोलापुरात दाखल झाले. गेल्या आठवड्यापासून कंपनी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने या युवकांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे, एसटी, विमान वाहतूक तसेच खासगी वाहतूक बंद असल्याने गावाकडे कसे जायचे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा राहिला. या तरुणांनी "घरी जायची सोय करा,' या मागणीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी व तमिळनाडू सरकारला दिले. मात्र, त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद नाही आल्याने त्यांनी थेट पायी जाण्याचा निर्णय घेतला. एका खोलीत एकत्र येऊन व्हिडिओ बनवून पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे त्यांच्यातील एकाने सांगितले. 
तीन दिवसांपूर्वी त्यांनी पुणे सोडले. चालत चालत ते मंगळवारी सकाळी सोलापुरात पोचले. संचारबंदीमुळे अत्यावश्‍यक सुविधा सोडल्या तर हॉटेल, खाद्यपदार्थांचे सर्व दुकाने बंद असल्याने रस्त्यातही खायला काय मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवसांपासून उपाशी असून मंगळवारी सकाळी सोलापुरात पोचल्यावर पोलिसांनी त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांना छत्रपती सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT