Degao Mahade mal.jpg 
सोलापूर

वनराई पुन्हा हिरवी होण्यासाठी देगावची तरुणाई एकत्र 

रमेश दास

वाळूज : देगाव, बुद्रुकवाडी, भैरववाडी व वाळुज (ता.मोहोळ) अशा चार गावांच्या शिवेवरील महादेव माळ हा एकेकाळी हिरवाईने नटलेला व जैवविविधतेने संपन्न होता. महादेवाचा माळ दुष्काळ, कमी होत चाललेले पर्जन्यमान, वादळीवारे व मानवी हस्तक्षेप यामुळे येथील कडूनिंब, बाभूळ, खैर त्याच बरोबर वनविभागाने लावलेली विविध प्रकारची झाडे आता विविध कारणांनी नष्ट झाली आहेत. हा माळ उजाड बोडका दिसत आहे. इथे महादेवाचे स्वयंभू आणि यमाईदेवीचे प्राचीन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथील लोक या महादेव मंदिरात दर्शनासाठी येतात. पूर्वी खूप गर्द झाडी होती. दाटीवाटीने हातात हात घालून एकमेकांना आधार देत उभी असलेली घनदाट वनराई होती. पावसाळ्यात गवताची हिरवळ, रंगीबेरंगी गवतफुलं मनमोहक वाटायची. आता काही झाडं वाळली आहेत. काही उन्मळुन पडली तर काही गायब झालीत. इथं पुन्हा हिरवी वनराई होण्यासाठी परिसरातील तरुणाईनं एकत्र येण्याची गरज आहे, अशी कल्पना कोकणात शिक्षक असलेले आणि कोरोनाच्या टाळेबंदी काळात गावी आलेले हनुमंत आतकरे यांनी मांडली. 

पाणी फाउंडेशन, वनराई, प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी दुष्काळी भागात राबविलेली वृक्षलागवड चळवळ यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून देगाव (ता.मोहोळ) येथील युवकांच्या पुढाकाराने आणि वन विभागाच्या मदतीने उजाड झालेला महादेवाची टेकडी आणि माळरान परिसरात इथं देशी झाडांची लागवड होणे गरजेचे आहे.

वन विभागाने लावलेली बरीच झाडे विदेशी आहेत. त्याचा काही उपयोग नाही. त्यांच्याकडील वड, पिंपळ, आंबा, हिरडा, बेहडा, बिब्बा, अर्जुन, उंबर, बहावा, कदंब, पळस, काटेसावर, कांचन, आपटा, बेल अशा प्रकारची देशी झाडे लावायचे ठरले. त्यासाठी वनविभागाकडे सरकारी रोपवाटीकेत नोंदणी करून ठेवण्याचे ठरले आहे. चांगला पाऊस पडला की, जुलै, ऑगस्ट मध्ये झाडे लागवड करण्यातचेही सर्वानुमते ठरले. येथील वृक्ष लागवड करून पुन्हा एकदा हा परिसर वनराईने बहरून जाणार आहे. 

यासाठी उन्हाळ्यात या ठिकाणी जेसीबीने खड्डे खणण्याचे नियोजन झाले आहे. यासाठी हनुमंत आतकरे, गणेश आतकरे, रामहरी नवले, राजकुमार पाटील, उपसरपंच अतुल आतकरे, महेश दगडे, श्रीधर आतकरे, डॉ.प्रदिप आतकरे, डॉ.मिलिंद लामगुंडे, मुकुंद भोसले, नागेश पाटील, गणेश सिरसट यांच्यासह युवकांनी यात सहभागी होण्याचे ठरवले आहे. 

संपादन : अरविंद मोटे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT