sachin pawar Sakal
सोलापूर

मरवडे येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

घटनेमुळे मरवडे गावावर शोककळा पसरली आहे

सकाळ वृत्तसेवा

मरवडे - नव्याने सुरु असलेल्या घराच्या बांधकामांवर छोट्या विद्युत पंपाद्वारे पाणी मारत असताना विजेच्या धक्क्याने मरवडे येथील सचिन तात्यासो पवार (वय २८) या उच्चशिक्षित युवकाचे निधन झाले. या घटनेमुळे मरवडे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, मरवडे-चडचण रस्त्यालगत स्वतःच्या शेतीमध्ये नव्याने सुरु असलेल्या बांधकामांवर पाणी मारण्यासाठी सचिन पवार हा तरुण सकाळी आठच्या सुमारास धाकटा भाऊ संकेत यांस सोबत घेऊन गेला होता. यावेळी पाण्याच्या दाबाने पाईप निघाल्याने तो जोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच छोटी पाण्याची मोटार उंचावरुन खाली पाण्यात पडली त्याचबरोबर विजेची केबल निसटून पाण्यात पडल्याने घराच्या छतावर विजेचा प्रवाह पसरला. त्यावेळी सचिन यास विजेचा जोरदार धक्का बसल्याने प्रसंगावधान राखून संकेतने विद्युत प्रवाह बंद केला. त्यानंतर उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल केले मात्र हा विजेचा धक्का तीव्र होता की उपचारापूर्वीच सचिन पवार याची प्राणज्योत मालवली. पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शल्यचिकीत्सा झाल्यानंतर दोन वाजता सचिनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन हा उच्चशिक्षित होता शिवाय स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. वडील तात्यासो पवार हे हॉटेल व्यावसायिक असून धाकटा भाऊ संकेत हा बांधकाम व्यावसायिक आहे. मरवडे येथे बिल्डिंग मटेरीयलचा मोठा व्यवसाय आहे. दोन्ही व्यवसायात तो अलिकडे वेळ देत होता. त्याच्या निधनामुळे पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गेल्या चार महिन्यात मरवडे गावात घडलेली ही तिसरी घटना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT