solapur zilla parishad sakal
सोलापूर

सोलापूर : व्हायरल प्रभागरचनेवर प्रशासनाने झटकले हात

झेडपी निवडणूक; इच्छुकांची उत्सुकता शिगेला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोना महामारी आणि ओबीसी आरक्षण यामुळे लांबणीवर पडलेली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी प्रारूप प्रभागरचना करण्यात आली आहे. सांगोला व पंढरपूर या तालुक्‍यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारूप प्रभागरचना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. या प्रभागरचनेचा आणि आमचा काहीच संबंध नसल्याचे सांगत प्रशासनाने हात झटकले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी सदस्य संख्या वाढ झाली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या आता ६८ वरून ७७ झाली आहे. जिल्ह्यातील ११ तालुका पंचायत समित्यांमधील सदस्यांची संख्या आता १३६ वरून १५४ एवढी झाली आहे. वाढलेली सदस्य संख्या आणि जिल्ह्यात अनगर (ता. मोहोळ), वैराग (ता. बार्शी), श्रीपूर-महाळुंग व नातेपुते (ता. माळशिरस) येथे नव्याने अस्तित्वात आलेली नगरपंचायत, अकलूज येथे नव्याने अस्तित्वात आलेली नगरपरिषद यामुळे आगामी निवडणुकांसाठी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची प्रभाग रचना कशी असणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या गावाचा समावेश कोणत्या गटात गणात झाला असेल? याची कमालीची उत्सुकता इच्छुकांमध्ये लागली आहे.

सोशल मीडियावर झळकत असलेल्या या प्रारूप प्रभागरचनेवर ना कोणाची सही आहे, ना कुठला शिक्का, त्यामुळे या प्रभागरचनेबद्दल संशय व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्हा प्रशासनाने तयार केलेली कच्ची प्रारूप प्रभागरचना शुक्रवारी (ता.११) राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. राज्यातील २५ जिल्हा परिषदांसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यात आली असून ८ ते १४ फेब्रुवारी दरम्यान, राज्य निवडणूक आयोग ही प्रारूप प्रभागरचना तपासणार आहे. त्यानंतर प्रारुप प्रभागरचना जाहीर करून त्यावर हरकती मागविण्याचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रारूप प्रभागरचनेचा आणि प्रशासनाचा काहीच संबंध नाही. राज्य निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभागरचना जाहीर करण्याबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. आयोगाच्या सूचनांनूसार प्रारूप प्रभाग रचना जाहीर होईल व त्यावर कोणाचे आक्षेप असतील तर स्वीकारले जातील.

- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT