सोलापूर

आम्ही का देऊ मुख्यमंत्री निधीला

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषद सदस्यांचे एक-दोन महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधी की पीएम केअरला द्यायचे याबाबत अद्याप कोणताही निर्णय जिल्हा परिषदेत झाला नाही. झेडपी अध्यक्षांसह पदाधिकारी किंवा कोणत्याही सदस्याने प्रशासनाकडे याबाबत अद्याप कोणताही पत्रव्यवहार केला नाही. "सकाळ'ने सर्वच पक्षांच्या प्रमुखांचा कल पाहिला. त्या वेळी भाजपवाल्यांचा कल पीएम केअरकडे तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकापवाल्यांचा कल मुख्यमंत्री सहायता निधीकडे असल्याचे दिसून आले. 

लॉकडाउन जाहीर झाल्यापासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विखुरलेले जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊ शकले नाहीत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी मदत करण्याबाबतचा विषयच चर्चेला आलेला नाही. लॉकडाउन संपल्यानंतर सर्व जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन एक-दोन महिन्याचे मानधन पीएम केअरला द्यायचे की मुख्यमंत्री सहायता निधीला द्यायचे याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

भाजपचे सदस्य आनंद तानवडे म्हणाले, ""पक्षाने आम्हाला पीएम केअरला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही आमचे मानधन पीएम केअरच्या निधीमध्ये जमा करणार आहोत. याशिवाय आम्ही स्थानिक पातळीवरही काही प्रमाणात मदत करण्यास सुरू केली आहे.'' 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते बळीराम साठे म्हणाले, ""याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र जर असा निर्णय घ्यायचा झाला तर आमचे मानधन हे आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहोत. स्थानिक पातळीवर आम्ही आमच्या गावात गोरगरिबांना धान्य वाटपाचा उपक्रम सुरू करणार आहोत.''

कॉंग्रेसचे सदस्य संजय गायकवाड म्हणाले, ""जर निर्णय झाला तर आमचे मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले जाईल. आम्ही स्थानिक पातळीवर आमच्या गावातील गरजूंना धान्य वाटप सुरू केले आहे.''

शेकापचे सदस्य ऍड. सचिन देशमुख म्हणाले, ""आपण महाराष्ट्रात राहतो. त्यामुळे आपली मदत ही मुख्यमंत्री सहायता निधीलाच झाली पाहिजे. तशा प्रकारचा ठराव जिल्हा परिषदेत करून तो निधी आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीलाच देऊ. मात्र, याबाबत अद्याप कोणीही विचारणा केली नाही.'' महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT