zp school teacher selected in top 50 teachers in the world 
सोलापूर

झेडपी शाळेतील शिक्षकाची जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांत निवड 

सुर्यकांत बनकर

करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) ः शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाणारे "ग्लोबल टीचर प्राईझ' जाहीर झाले असून यासाठी परितेवाडी (ता. माढा) या सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रणजितसिंह डिसले यांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी जगातील सर्वोत्तम 50 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतातील तिघांचा तर महाराष्ट्रातील एकमेव श्री. डिसले यांचा समावेश आहे. 

लंडन येथील "वाकी फौंडेशन'च्यावतीने दहा लाख अमेरिकन डॉलर्सचा हा पुरस्कार मे महिन्यात लंडन येथे होणाऱ्या "ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल फोरम' या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. असा बहुमान मिळवणारे डिसले गुरुजी हे एकमेव जिल्हा परिषद शिक्षक ठरले आहेत. "लेट्‌स क्रॉस द बॉर्डर' या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्त्राईल, पॅलेस्टाईन, अमेरिका व उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील पन्नास हजार मुलांची 'पीस आर्मी' तयार करून परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या त्यांच्या शैक्षणिक प्रयोगाची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे', अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे 
सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील अकरा वर्षांपासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडची पुस्तके आज 11 देशांतील दहा कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. "व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप' या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हुन अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. यापूर्वी 'मायक्रोसॉफ्ट', 'नॅशनल जिओग्राफीक सोसायटी' या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

BABAR AZAM: शतक झालं नाही, तरी बाबर आझमने इतिहास रचला! ७६ धावांच्या खेळीने विराट-पाँटिंगच्या खास क्लबमध्ये एन्ट्री, नेमका कोणता विक्रम?

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

“मी जीवन संपवतोय…” ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट; पोलिसांची धावाधाव

SCROLL FOR NEXT