पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या कन्येचा सातासमुद्रापार कर्तृत्वाचा ठसा

संतोष सिरसट

सोलापूर : सोलापूरची कन्या असलेली वेदा ब्रायन डीन-लोलगे हिला मॉरेसिअस सरकारने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. वेदा हिने तयार केलेल्या "इको-वॉरीस' मोबाईल गेममुळे तिला हा पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या लोलगे यांची ती कन्या आहे. 

"इको-वॉरीस' हा जगातील पहिलाच मोबाईल गेम आहे ज्याला "युनेस्को'ने सहकार्य केले आहे. यापूर्वी "युनेस्को' अशाप्रकारच्या कोणत्याही मोबाईल गेमला सहकार्य केले नाही. मॉरेसिअस सरकारच्या शिक्षण विभागाने हा प्रकल्प खासगी व शासकीय शाळांमध्ये दाखविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत "टॅब'चेही वाटप केले आहे. सोलापूर येथील लिटल फ्लॉवर हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी ती लंडनला गेली होती. सोलापूर येथे असताना तिने स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण, तिला यश आले आहे. मागील तीन वर्षांपूर्वी ती मॉरेसिअस देशात व्यवसाय सुरू करण्यासाठी गेली. "पॅडा ऍण्ड वूल्फ' या नावाने तिने जाहिरातीची कंपनी सुरू केली. त्या कंपनीच्या माध्यमातून तिने वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल ऍप तयार केले आहेत. मागील पाच-सहा महिन्यांत तिला चार-पाच पुरस्कार मिळाले असल्याचे वेदाची आई विद्या लोलगे यांनी "सकाळ'ला सांगितले. दक्षिण आफ्रिकाकडून "फिमेल रोल मोडल ऑफ द इअर 2019, दक्षिण आफ्रिका र्स्टाअप ऍवॉर्ड, डिजिटल वुमन ऍवॉर्ड देऊन गौरविले आहे. एक वर्षापूर्वी तिचा मॉरेसिअस येथील ब्रायन डीन यांच्याशी विवाह झाला आहे. पुढील काही महिन्यांत तिला मॉरेसिअसचे नागरिकत्वही मिळेल, असे लोलगे यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT