Ujjani Dam sakal
पश्चिम महाराष्ट्र

पुण्यातील पावसावर सोलापूरचे उजनी धरण निम्मे भरले! पाऊस ओसरल्याने दौंडवरून धरणात येतोय ४८,२८३ क्युसेकचा विसर्ग; धरणात ‘इतका’ पाणीसाठा, वाचा...

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ सुरूच असून, गुरुवारी (ता. ९) रात्री आठ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त (लाइव्ह) पाणीसाठा ३८.७३ टक्क्यांवर पोहोचला होता. धरणात सध्या २०.७५ टीएमसी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला असून, जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ सुरूच असून, गुरुवारी (ता. ९) रात्री आठ वाजेपर्यंत धरणातील उपयुक्त (लाइव्ह) पाणीसाठा ३८.७३ टक्क्यांवर पोहोचला होता. सोलापूर जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणात सध्या २०.७५ टीएमसी उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला असून, जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

चार दिवसांपूर्वी उणे पातळीवर असलेले उजनी धरण आता वेगाने भरत आहे. गुरुवारी रात्री आठ वाजेपर्यंत धरणातील एकूण पाणीसाठा ८४.४१ टीएमसी झाला असून, जलाशयाचे पाण्याखालील क्षेत्रफळ २५२.४९ चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे. धरणाची जलपातळी ४९३.६६० मीटर इतकी नोंदविण्यात आली.

दरम्यान, घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झाल्याने भीमा नदीतून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा वेगही कमी झाला आहे. दौंड येथून गुरुवारी रात्री आठ वाजता ४८ हजार २८३ क्युसेक विसर्ग सुरू होता. यापूर्वी हा विसर्ग दीड लाख क्युसेकहून अधिक होता. विसर्ग कमी झाला असला तरी धरणातील जलसाठा समाधानकारकरीत्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या पाणीपुरवठा, शेती आणि रब्बी हंगामाच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

उजनी धरणाची स्थिती (गुरुवारी रात्री ८ वाजता)

  • एकूण पाणीसाठा : ८४.४१ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा : २०.७५ टीएमसी

  • टक्केवारी : ३८.७३

  • दौंड येथून विसर्ग : ४८,२८३ क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT