Hake Family Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Bailpola Festival : सोनकेतील हाके कुटुंबाची चौथी पिढी बैलाच्या नादात दंग

सोनके (ता. पंढरपूर) येथील हाके कुटुंब चार पिढ्या देशी जातीवंत बैलाचे पालन करीत आहेत.

संजय हेगडे

तिसंगी - सोनके (ता. पंढरपूर) येथील हाके कुटुंब चार पिढ्या देशी जातीवंत बैलाचे पालन करीत आहेत. कै. शंकर विठोबा हाके, मुलगा मल्हारी शंकर हाके, नातु दत्तात्रय, औदुंबर, दादा मल्हारी हाके तर पनतु यशराज, पृथ्वीराज, शंभुराज, शुभम हाके अशा चार पिढ्या देशी खिलार बैलाचे पालन करीत आहेत.

पंजोबा यांनी केलेल्या बैल जोडीचा नाद पनतु उत्कृष्टरित्या पुढे सांभाळत आहेत. हौसेबरोबर शर्यतीची बैल व जातीवंत वळू बैलाचा सांभाळ हाके कुटुंब करीत आहेत. पंढरपूर तालुक्यातील पश्चिम भागात सांगोला तालुक्याचे सिमा भागावरील गाव शर्यतीची व वळु बैलासाठी या गावाची ओळख आहे.

कै. शंकर हाके यांचे मृत्यूनंतर मुलगा मल्हारी हाके व काशिलिंग हाके यानी उत्कृष्ट बैलाचा सांभाळ करीत आज नातु व पनतु बैलाचा सांभाळ करीत आहेत. हाके कुटुंबाची ओळख शर्यतीची व वळू बैल म्हणून प्रसिद्ध आहे. बैल पोळा सणाचे दिवशी नाद करुन बैलीची जंगी मिरवणूक सोनके गावातुन काढली जाते.

या वेळी हौशी मंडळी मिरवणूक पाहण्यासाठी येतात. आज मितिस चौथी पिढी या बैलाच्या नादात दंग आहे. बैल जोडी कुटुंबाला आधार बनली आहे. आज हाके कुटुंबाकडे शर्यतीची तीन बैल व वळू तीन बैल आहेत. ते उत्कृष्ट रित्या सांभाळ करतात. महाराष्ट्राची संस्कृती जपत आहे.

माझे वडिल कै. शंकर हाके याचा वारसा जपत माझ्या कुटुंबाने शर्यतीची व वळु बैल पालन करीत आहे. आज मितिस शर्यतीची व वळु बैलाची अनेक बक्षीस मिळाली आहेत. कुटुंबाला बैलाचा मोठा अधार आहे.

- मल्हारी हाके. बैल मालक, सोनके, ता. पंढरपूर

माझे आजोबा पासुन बैल पालन सुरू आहे. शर्यतीची व वळू बैल पाळणे आमचे कुटुंबाची होस आहे. आज मितिस माझेकडे सहा बैल आहेत.

- दत्तात्रय हाके, वळु मालक, सोनके, ता. पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

टिपू सुलतानचा फोटो पुन्हा लावणार, गैर काय? उपमहापौरांनी स्पष्ट केली भूमिका

Ujjain Temple: उज्जैनमध्ये आज 'चमत्कार'! पहाटे होणारी भस्म आरती आज दुपारी; वर्षातून फक्त एकदाच मिळते अशी संधी, पाहा काय आहे कारण

लाइफ बना दूँगा! रिलस्टार बनवण्याचं आमिष, १५ वर्षीय मुलीवर युट्यूबरचा लेकासह अत्याचार; दोघांना अटक

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

SCROLL FOR NEXT