Soybean crop in sugarcane crop 
पश्चिम महाराष्ट्र

उसाच्या लावणीच्या पिकात सोयाबीन पीक 

धनाजी पाटील

ऐतवडे खुर्द : येथे उसाच्या लावणीच्या पिकामध्ये उन्हाळी सोयाबीन पीक शेतकऱ्यांकडून घेण्यात आले आहे. सध्या हा सोयाबीन अतिशय चांगल्या प्रकारे आला असून या प्लॉटला वाळवा कृषी विभागाकडून भेट देऊन समाधान व्यक्त करण्यात आले. पीक पद्धती मधील बदल हा जमिनीच्या आरोग्यासाठी आवश्‍यक असणारी महत्त्वाची प्रक्रिया असल्याच्या मौलिक सल्ला यावेळी वाळवा कृषी विभाग टीमकडून उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आला.
 
वाळवा तालुका कृषी कार्यालय अंतर्गत विविध गावातील शेतकऱ्यांनी कसबे डिग्रज शेती संशोधन केंद्राचे 725 जातीचे उन्हाळी सोयाबीन कृषी अधिकारी भगवान माने यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर एकरांवर लागवड केली आहे. याची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी व त्यांचे मदतनीस पथक प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीनची पाहणी करून समाधान व्यक्त केले. 

यावेळी तालुका कृषी अधिकारी भगवानराव माने म्हणाले,""रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रीय शेती शाश्वत सस्वरुपाची व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणारी आहे. सेंद्रिय शेती संकल्पना पर्यावरण बाबीशी निगडित आहे. व्यापार केंद्रीत शेती व्यवस्थेमुळे शेतात रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, व तणनाशक अशा विविध घातक औषधांचा अतिवापर होत आहे. त्यामुळे वाढत चाललेलं तापमान व घटत चालेली जमिनीची सुपीकता यामुळे जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. म्हणून रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेती शाश्वत स्वरूपाचे असल्याचे आहे. सेंद्रिय शेती निसर्गातील विविध तत्वावर आधारित आहे.'' 
यावेळी तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांच्यासह त्यांच्या पथकातील मंडळ कृषी अधिकारी कुरळप विवेक ननवरे, सागर पाटील आत्मा, राहुल देशमुख, शेतकरी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT